सलमाननं ठोकला ‘भारत’च्या लुकचा ‘चौकार’

चारही पोस्टर्स सलमानचे वेगवेगळे लुक दर्शवणारे आहेत. चौथ्या पोस्टरमध्ये कतरीनाचा साधा लुक आहे. सलवार-कमीज-ओढणी आणि मोकळे सोडलेले केस अशा देशी गर्लच्या रूपात कतरीना, तर सलमान नेव्ही ऑफिसरच्या पांढऱ्या शुभ्र वेषात आहे.

SHARE

कायम हायलाईट्समध्ये असणारा अभिनेता सलमान खान मागील चार दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. ‘भारत’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून चौकार मारत सलमाननं सलग चौथ्या दिवशी आपला नवा लुक दाखवणारं पोस्टर रिलीज केलं आहे.


नेव्ही ऑफिसरचा लुक 

तिसऱ्या दिवशी ‘मॅडम सर’ असं म्हणत सलमाननं ‘भारत’मधील आपली नायिका कतरीना कैफचा लुक रिव्हील केला होता. यात सलमान एका खाण कामगाराच्या वेषात दिसला. ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ असं म्हणत चौथ्या दिवशी सलमाननं आपला नेव्ही ऑफिसरच्या रूपातील लुक सादर केला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये २०१०, दुसऱ्यामध्ये १९६४, तिसऱ्यामध्ये १९७०, तर चौथ्या पोस्टरमध्ये १९८५ मधील भारत म्हणजेच सलमान पाहायला मिळतो.


देशी गर्लच्या रूपात कतरीना

ही चारही पोस्टर्स सलमानचे वेगवेगळे लुक दर्शवणारे आहेत. चौथ्या पोस्टरमध्ये कतरीनाचा साधा लुक आहे. सलवार-कमीज-ओढणी आणि मोकळे सोडलेले केस अशा देशी गर्लच्या रूपात कतरीना, तर सलमान नेव्ही ऑफिसरच्या पांढऱ्या शुभ्र वेषात आहे. त्याच्या डोक्यावरील कॅपवर रिगल मरीनचा लोगोही आहे. या पोस्टरमध्ये त्यानं गाॅगलही लावला आहे. ‘जर्नी आफ अ मॅन अँड नेशन टुगेदर’ या टॅगलाईनसह प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर एक मोठं जहाज आणि एक छोटी नौकाही आहे.


वेगवेगळ्या सहा रूपांमध्ये

सलमानच्या चाहत्यांना ‘भारत’ची पोस्टर्स भलतीच आवडत आहेत. सलमाननं नवं पोस्टर शेअर केल्याबरोबर लगेचच त्याचे फॅन्स त्यावर कमेंट्स आणि काॅम्प्लिमेंट्स करायला सुरुवात करतात. ‘भारत’मध्ये सलमान वेगवेगळ्या सहा रूपांमध्ये दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापैकी समोर आलेले चारही लुक त्याच्या चाहत्यांना आवडले असून, काही फॅन्सकडून तर हा चित्रपट १००० कोटींचा व्यवसाय करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ‘भारत’च्या चौथ्या पोस्टरमधील कतरीनाही सलमानच्या फॅन्सला भावली आहे.हेही वाचा -

'मॅडम सर'सोबत तरुण सलमान

विकी बनणार 'अश्वत्थामा'!
संबंधित विषय
ताज्या बातम्या