'मॅडम सर'सोबत तरुण सलमान

'भारत'चं तिसरं पोस्टर या सर्वांपेक्षा हटके आहे. तिसऱ्या पोस्टरमध्ये सलमानसोबत त्याची 'मॅडम सर'ही आहे. ही 'मॅडम सर' म्हणजेच चित्रपटाची नायिका कतरीना कैफ. एखाद्या खाण कामगाराप्रमाणे गेटअप असलेला सलमान, तर केस मोकळे सोडलेली, व्हाईट शर्ट आणि ट्राऊझर परीधान केलेली कतरीना यात दिसते.

SHARE

अभिनेता सलमान खानच्या 'भारत' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा या चित्रपटाच्या रहस्यांवरून पडदा उठत आहे. मागील तीन दिवसांपासून दररोज 'भारत'चं एक नवं पोस्टर लाँच केलं जात आहे. याच मालिकेतील तिसऱ्या पोस्टरमध्ये तरुण सलमानच्या जोडीला त्याची 'मॅडम सर'ही आहे.


कधीही न पहिलेलं सलमानचं रूप 

'भारत'चं पहिलं पोस्टर सर्वांचंच लक्ष वेधून घेणारं ठरलं. आजवर कधीही न पहिलेलं सलमानचं रूप यात दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्याही. या पोस्टरमध्ये पिकलेली दाढी-मिशी असलेला सलमानचा उतार वयातील लुक रिव्हील करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तरुण सलमान त्याच्या चाहत्यांना भेटला. या पोस्टरवरील चकाचक शेव्ह केलेला चिकना चुपडा सल्लूही सर्वांना भावला. पहिल्या पोस्टरमधील सलमानचा लुक २०१० मधील होता, तर दुसऱ्या पोस्टरवरील त्याचा फोटो १९६४ मधील होता.


खाण कामगाराप्रमाणे गेटअप

'भारत'चं तिसरं पोस्टर या सर्वांपेक्षा हटके आहे. तिसऱ्या पोस्टरमध्ये सलमानसोबत त्याची 'मॅडम सर'ही आहे. ही 'मॅडम सर' म्हणजेच चित्रपटाची नायिका कतरीना कैफ. एखाद्या खाण कामगाराप्रमाणे गेटअप असलेला सलमान, तर केस मोकळे सोडलेली, व्हाईट शर्ट आणि ट्राऊझर परीधान केलेली कतरीना यात दिसते. सलमानला मिशी असून, त्याच्या डोक्यावर खाण कामगाराप्रमाणे टॅार्च असलेलं हॅल्मेटही आहे. या चित्रपटात सलमान कतरीनाला 'मॅडम सर' का म्हणतो ते 'भारत' रिलीज झाल्यावरच समजेल.


लुक १९७० मधील

सलमाननं हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं असून 'आणि मग माझ्या जीवनात आली मॅडम सर', असं त्यासोबत ट्वीट केलं आहे. सलमानचा हा लुक १९७० मधील म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या पोस्टरच्या मधल्या कालावधीतील आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान-कतरीना या जोडीच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कलाकारांची केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे.


६ दशकांमधील प्रवास

अली अब्बास जफर यांनी 'भारत'चं दिग्दर्शन केलं आहे. अतुल अग्निहोत्री यांनी रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि टी-सीरीजच्या बॅनरखाली निर्माण केलेल्या या चित्रपटात एका व्यक्तीचा सहा दशकांमधील रोमांचक प्रवास दाखवण्यात आला आहे. याच कारणामुळं या चित्रपटात सलमाननं साकारलेल्या भारतच्या जीवनप्रवासातील वेगवेगळी रूपं पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान एका मुलानं आपल्या वडिलांना दिलेल्या वचनावर आधारीत आहे.हेही वाचा  -

विकी बनणार 'अश्वत्थामा'!

साठीतल्या तापसी-भूमी पाहिल्या का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या