Advertisement

साठीतल्या तापसी-भूमी पाहिल्या का?

'सांड की आंख' यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार असल्यानं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तापसीनं लिहिलं आहे की, यंदाच्या दिवाळीत फटाके फोडणार नाही गोळ्या झाडणार! तर भूमीनं लिहिलं आहे की, हा रोल आजपर्यंतचा सर्वात कठीण आणि प्रेरणादायक व्यक्तिरेखांपैकी एक आहे.

साठीतल्या तापसी-भूमी पाहिल्या का?
SHARES

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री तापसी पन्नूची चांगलीच चलती आहे. एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारी तापसी कायम आव्हानात्मक भूमिकांमुळे चर्चेत आहे. आता ती भूमी पेडणेकरसोबत एका वेगळ्याच विषयावर आधारित असलेल्या चित्रपटात झळकणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. तापसी आणि भूमीचा या चित्रपटातील साठीतील लुक पाहिला का?


लुक रिव्हील 

सध्या सगळीकडं चर्चा आहे ती भूमी आणि तापसी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सांड की आंख' या चित्रपटाची. या चित्रपटाची काही पोस्टर्स यापूर्वी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आली, पण त्यात दोघींचेही चेहरे लपवण्यात आले होते. या पोस्टर्समध्ये दोघी गाई-म्हैशींच्या शेणाच्या गोवऱ्या थापताना, ट्रॅक्टर चालवताना, सायकल चालवताना पाठमोऱ्या दिसल्या, पण त्यांचा लुक रिव्हील करण्यात आला नव्हता. आता या दोघींचा 'सांड की आंख'मधील लुक रिव्हील करण्यात आला आहे.


नॅान ग्लॅमरस भूमिकांमध्ये 

आजवर कधी ग्लॅमरस, तर कधी नॅान ग्लॅमरस भूमिकांमध्येही रसिकांवर जादू करण्यात यशस्वी झालेल्या तापसी-भूमी 'सांड की आंख'मध्ये पुन्हा एकदा नॅान ग्लॅमरस भूमिकांमध्ये दिसणार आहेत. इतकंच नाही तर नुकताच रिव्हील करण्यात आलेल्या पोस्टरनुसार त्या जवळजवळ ६० वर्षे वयाच्या व्यक्तिरेखा साकारत असल्याचं दिसतं. हा चित्रपट वयाच्या साठाव्या वर्षी जवळजवळ ७०० मेडल्स जिंकणाऱ्या चंद्रो तोमर आणि तिची वहिनी प्रकाशी तोमर यांची कथा सांगणारा आहे.


दिवाळीत प्रदर्शित

'सांड की आंख' यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार असल्यानं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तापसीनं लिहिलं आहे की, यंदाच्या दिवाळीत फटाके फोडणार नाही गोळ्या झाडणार! तर भूमीनं लिहिलं आहे की, हा रोल आजपर्यंतचा सर्वात कठीण आणि प्रेरणादायक व्यक्तिरेखांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या पोस्टवर लिहिलेलं 'तन बुढा होता है, मन बुढा नहीं होता', हे वाक्य केवळ चंद्रो आणि प्रकाशी यांचा जीवनाकडं पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवणारं नसून, ऐन उमेदीत उमेद हरवलेल्यांना नव किरण दाखवणारं आणि नवी उर्जा देणारंही आहे.


चित्रीकरण बाघपत, हस्तिनापूरमध्ये

निधी परमार आणि अनुराग कश्यप यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आली नसली तरी लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या चित्रपटात तापसी-भूमीच्या जोडीला प्रकाश झा, विकी काडीयन आणि विनीत सिंह यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण बाघपत, हस्तिनापूर, मवाना यांसारख्या ठिकाणी करण्यात आलं आहे. हेही वाचा -

‘भारत’साठी ‘पिकला’ सलमान!

दीपिकाला मेकअपसाठी लागतात ४ तास!
संबंधित विषय
Advertisement