Advertisement

दीपिकाला मेकअपसाठी लागतात ४ तास!

दीपिकाचा हा मेकअप इतका प्रभावी आहे की, इतरवेळी तिला पाहताच तिची आॅटोग्राफ घेण्यासाठी तोबा गर्दी करणारे चाहतेही तिला ओळखू शकत नाहीत. असाच एक किस्सा नुकताच घडला. दीपिका मेकअप करून बाईकवरून आली आणि भर रस्त्यात एका दुकानाबाहेर उभी राहिली, पण कोणीही तिला ओळखलं नाही.

दीपिकाला मेकअपसाठी लागतात ४ तास!
SHARES

अभिनेत्रींचा मेकअप आणि त्यांचे नखरे जगजाहिर आहेत. काही अभिनेत्रींना मेकअप आणि गेटअपसाठी इतका वेळ लागतो की, चित्रपटाची संपूर्ण टिम त्यांची वाट पाहून बेजार होते. अशातच हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणला मेकअपसाठी जवळजवळ चार तास लागत असल्याची माहिती मिळाली आहे.


या कारणामुळं मेकअपसाठी वेळ

होय, हे खरं आहे. सध्या दीपिकाला मेकअप करण्यासाठी जवळजवळ चार तास लागत असल्याचं समजतं. दीपिका सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' या आगामी हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील दीपिकाचा लुक रिव्हील करण्यात आला आहे. या चित्रपटात दीपिका अॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीची भूमिका साकारत आहे. त्यामुळं तिला मेकअपसाठी इतका वेळ द्यावा लागत आहे.


चाहत्यांनी ओळखलंही नाही

दीपिकाचा हा मेकअप इतका प्रभावी आहे की, इतरवेळी तिला पाहताच तिची आॅटोग्राफ घेण्यासाठी तोबा गर्दी करणारे चाहतेही तिला ओळखू शकत नाहीत. असाच एक किस्सा नुकताच घडला. दीपिका मेकअप करून बाईकवरून आली आणि भर रस्त्यात एका दुकानाबाहेर उभी राहिली, पण कोणीही तिला ओळखलं नाही. अॅसीड हल्ल्यामुळं विद्रुप झालेला दीपिकाचा चेहरा पहिल्यावर ही तिच सुंदरा आहे जिनं मस्तानी आणि पद्मावतीसारख्या सौंदर्यवतींची भूमिका साकारली होती यावर कुणाचा विश्वास बसत नाही.


निर्मितीची जबाबदारीही 

दीपिकाला करण्यात येणाऱ्या या मेकअपची सर्वच पातळीवर कौतुक होत असलं तरी हे काम वाटतं तितकं सोपं मात्र मुळीच नाही. रोज एकाच प्रकारचा मेकअप करताना जवळपास चार तास लागणारा अवधी. त्यासोबतच मेकअप काढून सामान्य रूपात परतताना त्याहीपेक्षा लागणारा अधिक वेळ यांचं कॅल्क्युलेशन केलं तर हे काम संयमाचा अंत पाहणारं असल्याचं जाणवतं. दीपिका या चित्रपटात अॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या मालती नावाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच दीपिकानं या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारीही सांभाळली आहे.



हेही वाचा -

तापसीनं पुन्हा बुक केला महिला दिन

शाहरुखने विकले २२ सिनेमांचे हक्क




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा