Advertisement

तापसीनं पुन्हा बुक केला महिला दिन

तापसी सध्या एका आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. 'थप्पड' या शीर्षकांतर्गत बनणाऱ्या सोशल ड्रामा असलेल्या या चित्रपटाची कथा वास्तव जीवनातील घटनेवरून प्रेरीत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं तापसी आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

तापसीनं पुन्हा बुक केला महिला दिन
SHARES

दक्षिणात्य सिनेसृष्टीतून हिंदीकडे वळल्यानंतर लक्षवेधी भूमिका साकारत अल्पावधीत लोकप्रिय बनलेल्या तापसी पन्नूनं सुरुवातीपासूनच मसालापटांपेक्षा स्त्रीप्रधान चित्रपटांना प्राधान्य दिलं आहे. यंदा महिला दिनाला म्हणजेच ८ मार्चला रिलीज झालेल्या तापसीच्या 'बदला' चित्रपटानंतर तापसीनं पुढल्या वर्षीचा महिला दिनही आपल्याच नावे बुक केला आहे.


बदलाचा १३६ कोटींचा गल्ला 

यंदा महिला दिनाचं औचित्य साधत रिलीज झालेल्या दिग्दर्शक सुजॅाय घोष यांच्या 'बदला'नं बॅाक्स आॅफिसवर जवळजवळ १३६ कोटींचा गल्ला जमवत बाजी मारली आहे. या चित्रपटात तापसीसोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तापसीनं एका सशक्त यशस्वी व्यावसायिकेची भूमिका साकारली होती. निगेटीव्ह असूनही ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या यशानंतर तापसीनं पुढल्या वर्षाचा म्हणजेच २०२० मधील महिला दिनाच्या आसपास येणारा शुक्रवारही बुक केल्याची माहिती मिळाली आहे. 


थप्पडमध्ये मुख्य भूमिकेत

तापसी सध्या एका आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. 'थप्पड' या शीर्षकांतर्गत बनणाऱ्या सोशल ड्रामा असलेल्या या चित्रपटाची कथा वास्तव जीवनातील घटनेवरून प्रेरीत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं तापसी आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये अनुभव आणि तापसी यांचा 'मुल्क' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीच 'थप्पड'मध्ये तापसीच मुख्य भूमिका साकारणार असल्याचं जवळजवळ पक्कं झालं होतं. आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.


मध्यमवर्गीय तरुणीची भूमिका

स्त्रीप्रधान विषय असलेल्या 'थप्पड'च्या माध्यमातून समाजासमोर एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी तापसी एका मध्यमवर्गीय तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या जोडीला हिंदीतील आघाडीचे कलाकार सहाय्यक भूमिकांमध्ये दिसतील. सिन्हा यांनीच या सोशल ड्रामाचं लेखन केलं असून, निर्मितीही त्यांचीच आहे. दिल्लीमध्ये आॅगस्ट महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्याची योजना आखण्यात आली आहे. पुढल्या वर्षी ८ मार्च ही तारीख रविवारी येत असल्यानं कदाचित हा चित्रपट त्यापूर्वी ६ मार्चला प्रदर्शित करण्यात येण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

शाहरुखने विकले २२ सिनेमांचे हक्क

संधू-अमरनाथ करणार इतिहासाची पुनरावृत्ती!
संबंधित विषय
Advertisement