Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

संधू-अमरनाथ करणार इतिहासाची पुनरावृत्ती!

जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आता २०१९ मधील विश्वचषकाचे वेध लागले आहेत. असं असताना हिंदी चित्रपटसृष्टी मात्र १९८३ मध्ये भारतानं पटकावलेल्या पहिल्या विश्वचषकाच्या आठवणी जागृत करण्यासाठी सज्ज होत आहे. ‘८३’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून १९८३ मधील विश्वचषकातील सुवर्णस्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे.

संधू-अमरनाथ करणार इतिहासाची पुनरावृत्ती!
SHARES

सध्या आयपीएल सुरू असल्यानं क्रिकेटचा फिव्हर चांगलाच चढला आहे. या मागोमाग येणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाची उत्कंठाही सर्वांना आहे. अशातच माजी क्रिकेटपटू बलविंदर सिंह संधू आणि मोहिंदर अमरनाथ '८३’ या आगामी हिंदी सिनेमातील कलाकारांचे कोच बनले आहेत.


 सुवर्णस्मृतींना उजाळा

जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आता २०१९ मधील विश्वचषकाचे वेध लागले आहेत. असं असताना हिंदी चित्रपटसृष्टी मात्र १९८३ मध्ये भारतानं पटकावलेल्या पहिल्या विश्वचषकाच्या आठवणी जागृत करण्यासाठी सज्ज होत आहे. ‘८३’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून १९८३ मधील विश्वचषकातील सुवर्णस्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे. या निमित्तानं रुपेरी पडद्यावर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी बलविंदर सिंह संधू आणि मोहिंदर अमरनाथही सज्ज झाले आहेत.


क्रिकेटचा कसून सराव 

या चित्रपटात ८३ च्या भारतीय क्रिकेट संघाच्या कप्तानाच्या म्हणजेच अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह दिसणार आहे. रणवीर आणि त्याची टिम सध्या धर्मशाला येथे क्रिकेटचा कसून सराव करण्यात व्यग्र आहे. रणवीरसह चित्रपटातील सर्व कलाकारांना क्रिकेट तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मैदानावर उतरण्यासाठी सज्ज करण्यात येत आहे. या कामी बलविंदर सिंह संधू आणि मोहिंदर अमरनाथ यांचं विशेष मार्गदर्शन लाभत आहे.


१० एप्रिल २०२० ला प्रदर्शित 

धर्मशालामध्ये सुरू असलेल्या सरावाचे फोटो रणवीरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत बलविंदर सिंह संधू आणि मोहिंदर अमरनाथही आहेत. जिमी!!! एकमेव चॅम्पियन आफ चॅम्पियन्स… मोहिंदर अमरनाथ!!! असं रणवीरनं फोटोसोबत लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरनं कपिल देव यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. जो चाहत्यांना खुप आवडला होता. पुढल्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला वास्तविक लोकेशन्सवर प्रारंभ करण्यात येणार आहे. १० एप्रिल २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.हेही वाचा -

वेंगसरकरांच्या भूमिकेत क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आदिनाथ
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा