वेंगसरकरांच्या भूमिकेत क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आदिनाथ

'८३' या चित्रपटात आदिनाथ कर्नल दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेसाठी बलविंदर सिंग संधू यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रांमध्ये आदिनाथनं प्रवेश केला असून, सध्या तो क्रिकेटचा कसून सराव करत आहे.

SHARE

मागील बऱ्याच दिवसांपासून कबीर खान यांच्या '८३' या आगामी हिंदी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. १९८३ मध्ये ज्येष्ठ अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतील क्रिकेट संघानं प्रथमच जिंकलेल्या विश्वचषकाची गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यासाठी सध्या या सिनेमाच्या स्टारकास्टची जुळवाजुळव सुरू आहे. या टिममध्ये आता मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेचीही वर्णी लागली आहे.


क्रिकेटचा कसून सराव

'८३' या चित्रपटात आदिनाथ कर्नल दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेसाठी बलविंदर सिंग संधू यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रांमध्ये आदिनाथनं प्रवेश केला असून, सध्या तो क्रिकेटचा कसून सराव करत आहे. माल्कम मार्शलच्या बाऊंसरचा सामना करताना दिलीप वेंगसरकरांना दुखापत झाल्यामुळं ते विश्वचषकाची फायनल खेळू शकले नव्हते. चित्रपटातही ते दृश्य पाहायला मिळणार असल्यानं आदिनाथला बाऊंसरचा सामना करण्याची प्रॅक्टीस करावी लागणार आहे.


जाहिरातसाठी ऑडिशन

कबीर खानसारख्या आघाडीच्या दिग्दर्शकाच्या '८३' सारख्या मोठ्या चित्रपटात काम करण्याबाबत आदिनाथ म्हणाला की, गेल्या वर्षी जुलैमध्ये मी दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचं शूट संपवून परत आलो होतो. ज्यामध्ये मी नायकही साकारला आहे. मला त्या व्यक्तिरेखेसाठी मिशीमध्ये राहणं गरजेचं होतं. त्याच वेळी मी एका जाहिरातसाठीही ऑडिशन दिलं होतं. ती जाहिरात मला मिळाली नाही; परंतु त्याच दिवशी मला पुन्हा बोलावलं गेलं आणि त्याच्या पुढल्या दिवशी '८३'ची ऑडिशन घेतली गेली.


नक्कल करण्यासाठी १५ मिनिटं 

वेंगसरकरांच्या भूमिकेसाठी निवड करण्याबाबत आदिनाथ म्हणाला की, मला असं वाटतं त्यावेळी ठेवलेल्या मिशांमुळंच कदाचित मी तेव्हा त्यांना पूर्वीच्या दिलीप वेंगसरकरांसारखा दिसलो असेन. ऑडिशन खूप वेगळी  होती. त्यांनी मला दिलीपसरांचं अनुकरण करण्यास सांगितलं. त्यासाठी मला संदर्भ व्हिडिओ म्हणजे त्यांच्या पत्रकार परिषदांचा संदर्भ दिला होता. ते पत्रकारांशी कसे बोलतात ते पाहून मला त्यांच्या देहबोलीची नक्कल करण्यासाठी १५ मिनिटं लागली. मी एक शॉट दिला आणि त्यांना तो खूप आवडला. तो क्षण माझ्यासाठी जग जिंकण्यासारखा होता. कारण मला कबीर खानच्या चित्रपटात भूमिका मिळाली होती. यासोबतच मला भारतातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर खोलवर उमटलेल्या क्षणांचं आणि एका व्यक्तीचं अनुकरण करण्याची संधी मिळाली होती.


त्रिभाषी चित्रपट 

या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य म्हणजेच कपिल देव यांच्या भूमिकेत दिसेल, तर अमिमी विर्क - बलविंदर सिंह संधू, सहिल खट्टर - सय्यद किरमानी, जिवा - कृष्णमचारी श्रीकांत, चिराग पाटील - संदिप पाटील आणि पंकज त्रिपाठी - व्यवस्थापक पीआर मान सिंग यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय या चित्रपटात ताहिर भासीन, साकिब सलीम, हार्डी संधू आणि आर. बद्री हे कलाकारही विविध भारतीय क्रिकेटपटूंच्या भूमिकांमध्ये झळकतील. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतील पहिला त्रिभाषी चित्रपट असलेला '८३' पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.हेही वाचा-

कलाकारांनी तरुणाईला दिला ‘नेशन फर्स्ट’चा संदेश

सागर बनला ‘भारतीय घटनेचा शिल्पकार’
संबंधित विषय
ताज्या बातम्या