‘भारत’साठी ‘पिकला’ सलमान!

सोशल मीडियावर ‘भारत’मधील सलमानचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला आहे. या फोटोत तो एका वयस्कर व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो. पिकलेली दाढी-मिशी आणि केस या लुकमध्ये सलमानला यापूर्वी कधीच पाहिलेलं नसल्यानं ‘भारत’मधील त्याच्या या भूमिकेबाबत उत्सुकता वाढते.

‘भारत’साठी ‘पिकला’ सलमान!
SHARES

बाॅलीवूडचा सुपरस्टार सलमान खान जेव्हा काहीही करतो, तेव्हा ते चर्चेत राहतंच. मग तो चित्रपट असो, वा टीव्ही शो… मागील बऱ्याच दिवसांपासून सलमानच्या ‘भारत’ या आगामी हिंदी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकतला लागली आहे. या चित्रपटात तो एका ‘पिकलेल्या’ म्हणजेच वयस्कर व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं तूर्तास स्पष्ट झालं आहे.


फर्स्ट लुक रिव्हील 

सलमानच्या बहुप्रतिक्षीत ‘भारत’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ‘भारत’मधील सलमानचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला आहे. या फोटोत तो एका वयस्कर व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो. पिकलेली दाढी-मिशी आणि केस या लुकमध्ये सलमानला यापूर्वी कधीच पाहिलेलं नसल्यानं ‘भारत’मधील त्याच्या या भूमिकेबाबत उत्सुकता वाढते. या पोस्टरच्या खालच्या बाजूला जॅकी श्राॅफही लहान मुलांसोबत दिसतो. यावरून सलमान आणि जॅकी यांचं या चित्रपटात नातंही पाहायला मिळणार असल्याची जाणीव होते.


माझं आयुष्य रंगीत 

हे पोस्टर शेअर करताना सलमाननं आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत. सलमाननं लिहिलं आहे की, जेवढे सफेद केस माझ्या दाढी आणि केसांमध्ये आहेत, त्यापेक्षा कित्येक पटीनं माझं आयुष्य रंगीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी यंदा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जूनच्या आसपास हा चित्रपट रिलीज करण्याचं निर्माता-दिग्दर्शकांनी ठरवलं आहे.


कोरियन चित्रपटाचा रिमेक 

२४ एप्रिल रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सलमानची मुख्य भूमिका असलेला हा पिरीयड ड्रामा दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘ओडे टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. आबू धाबी, स्पेन, माल्टा या देशांसोबतच पंजाब-दिल्लीमध्ये ‘भारत’ शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना कैफ मुख्य भूमिकेत असून, दिशा पाटनी, जॅकी श्राफ, तब्बू, सुनील ग्रोव्हर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.हेही वाचा- 

दीपिकाला मेकअपसाठी लागतात ४ तास!

तापसीनं पुन्हा बुक केला महिला दिन
संबंधित विषय