विकी बनणार 'अश्वत्थामा'!

विकीच्या 'उरी'मधील 'हाऊ इज द जोश' हा संवाद इतका गाजला आहे की, याचा वापर दैनंदिन जीवनात अगदी सहजपणं होऊ लागला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक आदित्य धर 'अश्वत्थामा'चंही दिग्दर्शन करणार आहे. रॅानी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

SHARE

अभिनेता विकी कौशलनं अल्पावधीत आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. 'राजी'नंतर 'तख्त' या आगामी चित्रपटात पुन्हा आलिया भट्टसोबत दिसणार असल्यानं लाइमलाईटमध्ये आलेला विकी रुपेरी पडद्यावर 'अश्वत्थामा' साकारणार आहे.


'उरी'नं करियर वेगळ्याच उंचीवर

प्रत्येक चित्रपटागणिक काहीतरी वेगळं करत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या विकीनं आपल्या करियरची सुरुवात 'गँग्ज आॅफ वासेपूर' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत केली होती. त्यानंतर लव शव ते चिकन खुराना', 'मसान', 'संजू', 'राझी' या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या विकीचं करियर 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटापर्यंत पोहोचलं आहे. 'उरी'नं विकीच्या करियरला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. करियरच्या या वळणावर तो अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी आली आहे.


पिरीयड वॅार

विकीच्या 'उरी'मधील 'हाऊ इज द जोश' हा संवाद इतका गाजला आहे की, याचा वापर दैनंदिन जीवनात अगदी सहजपणं होऊ लागला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक आदित्य धर 'अश्वत्थामा'चंही दिग्दर्शन करणार आहे. रॅानी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अश्वत्थामा यांचं जीवन जगासमोर आणणारा पिरीयड वॅार चित्रपट असल्याची माहिती मिळाली आहे. 'उरी' प्रदर्शित झाल्यावर लगेचच आदित्यनं 'अश्वत्थामा'वर काम करायला सुरुवात केली होती. 


पुढील वर्षीपासून चित्रीकरण

लेखन पातळीवर स्क्रीनप्ले लिहिण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढल्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. दरम्याच्या काळात विकी आपले इतर चित्रपट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. यात एका हॅाररपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली जाणार असून, दिग्दर्शनाची जबाबदारी भानू प्रताप सिंग या नवोदित दिग्दर्शकाकडं सोपवण्यात आल्याचं समजतं.हेही वाचा-

साठीतल्या तापसी-भूमी पाहिल्या का?

‘भारत’साठी ‘पिकला’ सलमान!
संबंधित विषय
ताज्या बातम्या