Advertisement

कंगना-राजकुमारचे वेडे चाळे पाहिले का?

सर्वसाधारणपणं आपण एखाद्या व्यक्तीला ‘मेंटल है क्या?’ असं विचारलं, तर ती क्षणार्धात चिडते. कंगना आणि राजकुमार हे मात्र इतके कूल आहेत की, त्यांनी ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातच मुख्य भूमिका साकारली आहे. १७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टर शूटसाठी कंगना आणि राजकुमार यांनी अक्षरश: वेडेपणाची हद्द पार केली आहे.

कंगना-राजकुमारचे वेडे चाळे पाहिले का?
SHARES

चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी आजच्या पिढीतील बरेच कलाकार कोणतंही आव्हान स्वीकारायला तयार असतात. यात कंगना रणौत आणि राजकुमार राव या कलाकारांचाही समावेश आहे. आता तर या दोघांच्या वेडेपणाची हद्द झाली आहे.


मेंटल है क्या

सर्वसाधारणपणं आपण एखाद्या व्यक्तीला ‘मेंटल है क्या?’ असं विचारलं, तर ती क्षणार्धात चिडते. कंगना आणि राजकुमार हे मात्र इतके कूल आहेत की, त्यांनी ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातच मुख्य भूमिका साकारली आहे. १७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टर शूटसाठी कंगना आणि राजकुमार यांनी अक्षरश: वेडेपणाची हद्द पार केली आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.


वेडेपणाची हद्दच 

कंगना आणि राजकुमार यांनी ‘मेंटल है क्या’च्या नवीन पोस्टरमध्ये वेडेपणाची हद्दच केली आहे. या पोस्टरमध्ये दोघांचेही चेहरे समोरासमोर आहेत. दोघांनीही आपापली जीभ बाहेर काढली असून, त्यावर ब्लेड ठेवलं आहे. ही खरं तर फोटोग्राफीची कमाल आहे. त्यामुळं कुणीही असा प्रयत्न करण्याचं धाडस करू नये. हा केवळ लक्ष वेधून घेण्याचा खेळ आहे. कंगना आणि राजकुमार यांचा ‘मेंटल है क्या’साठी केलेला वेडेपणा मात्र थक्क करणारा आहे. यासाठी चित्रपटाच्या प्रमोशनल टीमनं सादर केलेल्या संकल्पनांचं मात्र कौतुक करावंच लागेल.


जीभेवर ब्लेड 

यापूर्वीही या चित्रपटाची अशीच लक्ष वेधून घेणारी पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. ज्यात कधी कंगना लायटर पेटवून आपल्या जीभेला चटका देताना दिसते, तर राजकुमार आपल्या कपाळावर हसत हसत सिगारेटचे चटके देतो… कंगना आपले डोळे तिरळे करते, तर राजकुमार आपल्या डोळ्यांत बोटं घालतो… कंगना एखाद्या धारदार सूरीमध्ये आपला चेहरा पाहते, तर राजकुमार कोयत्यानं आपलं बोट कापतो… या सर्वांमध्ये जीभेवर ब्लेड ठेवण्याची संकल्पना अफलातून वाटते.


दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडींचं

एकता कपूर, शोभा कपूर आणि शैलेश सिंह यांची निर्मिती असलेल्या ‘मेंटल है क्या’चं दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केलं आहे. प्रकाश हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेता, पटकथालेखक आणि दिग्दर्शक आहेत. यापूर्वी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश यांचा ‘मेंटल है क्या’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. २००६ मध्ये प्रकाश यांनी बच्चे कंपनीसाठी बनवलेल्या ‘बोम्मलता’ या तेलुगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.



हेही वाचा -

सलमाननं ठोकला ‘भारत’च्या लुकचा ‘चौकार’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा