• करण जोहरच्या 'बॉम्बे टॉकिज'चं शुटिंग सुरु
SHARE

'बॉम्बे टॉकीज २' चित्रपटाच्या माध्यमातून करण लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी एक लघुपट घेऊन येत आहे. या लघुपटात विकी कौशल आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय या चित्रपटात नेहा धुपिया देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. करण जोहरनं ट्वीटरवर यासंदर्भातील फोटो शेअर करत ही माहिती दिली. 'बॉम्बे टॉकिज, सीन नंबर २०, शूट नंबर १ आणि चेक नंबर ४' असं फोटोवर लिहिण्यात आलं आहे.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉम्बे टॉकिज' चित्रपटात चार लघुपट होते. त्यातील 'अजीब दास्ताँ है ये' या लघुपटाचं दिग्दर्शन करणनं केलं होतं. या लघुपटात राणी मुखर्जी आणि रणदीप हुडा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याचाच आता सिक्वेल येत आहे.'बॉम्बे टॉकिज २'मधील एका लघुपटाची निर्मिती करण करणार आहे. तर इतर तीन लघुपटांचे दिग्दर्शन अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी करणार आहेत. असं बोललं जात आहे की, करण दिग्दर्शित करत असलेला लघुपट कॉमेडी आहे. त्यामुळे नक्कीच विकी आणि कियारासाठी हा चित्रपट आव्हानात्मक असेल. कारण दोघांनी यापूर्वी कधीच कॉमेडी चित्रपटात काम केलेलं नाही. विकी कौशलनं यापूर्वी 'मसान' आणि 'राजी' या चित्रपटात काम केलं आहे. 'मसान' चित्रपटातल्या भूमिकेमुळे विकीचं खूप कौतुक झालं होतं. तर कियारा पहिल्यांदा 'मशीन' चित्रपटात झळकली होती.हेही वाचा

शशी कपूर, 'ती' आणि बरंच काही!


संबंधित विषय
ताज्या बातम्या