Advertisement

शशी कपूर, 'ती' आणि बरंच काही!


शशी कपूर, 'ती' आणि बरंच काही!
SHARES

हिंदी चित्रपट सृष्टीचा चॉकलेट आणि चार्मिंग हिरो. ज्याला सारं बॉलिवूड म्हणायचं हँडसम कपूर. तो हिरो म्हणजे शशी कपूर. शशी कपूर हे नाव घेतल्यावर डोळ्यांसमोर उभा राहातो तो देखणा आणि हसरा चेहरा. घरंदाज आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व!शशी कपूर यांचं खरं नाव

शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी झाला. शशी कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र आणि राज कपूर आणि शम्मी कपूर यांचे भाऊ. शशी कपूर यांचं खरं नाव बलबीर राज कपूर होतं. पण चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना त्यांनी शशी कपूर हे नाव ठेवलं.बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण

शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून 'आग' सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. जवळपास ११ चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. ६० आणि ७० च्या दशकात त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट बॉलिवूडला दिले. त्यामध्ये 'जब जब फुल खिलें’, 'कन्यादान’, 'शर्मीला’, 'आ गले लग जा’, 'दीवार’, 'रोटी कपडा और मकान' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
शशी कपूर यांची लव्हस्टोरी

वडिलांच्या सल्ल्यानंतर शशी यांनी 'गोदर्फे कँडल' यांचा थिएटर ग्रुप जॉइन केला होता. या ग्रुपसोबत भ्रमंती करतानाच १९५६ मध्ये शशी कपूर यांची भेट इंग्रजी अभिनेत्री जेनिफर कँडेल हिच्यासोबत झाली. तेव्हा ते कोलकात्यात वेगवेगळ्या थिएटर ग्रुपसोबत काम करत होते. यावेळी जेनिफर यांच्यासोबत मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सुरुवातीला जेनिफर लग्नासाठी तयार नव्हत्या. पण शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली यांनी समजवल्यानंतर जेनिफर लग्नाला तयार झाल्या. 

जेनिफर यांच्या वडिलांचा आणि बहिणीचा लग्नाला विरोध होता. पण शम्मी कपूर यांनी जेनिफर आणि त्यांच्या बहिणीची समजूत घातली. त्यानंतर दोघांचं लग्न झालं. लग्न झालं तेव्हा शशी कपूर २൦ वर्षांचे होते. कपूर फॅमिलीमध्ये आधी करिअरला प्राधान्य देण्याची प्रथा होती. मात्र, २०व्या वर्षीच लग्नगाठीत अडकणारे शशी हे पहिले कपूर होते. पण १९८४ मध्ये पत्नी जेनिफरचा कर्करोगानं मृत्यू झाला. त्यामुळे शशी कपूर हे पूर्ण खचून गेले होते. त्यांचं जेनिफरवर एवढं प्रेम होतं की त्यांनी दुसऱ्या लग्नाचा कधी विचार देखील केला नाही.आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणारे पहिले भारतीय अभिनेते

शशी कपूर यांनी अमेरिकन आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 'हाऊसहोल्डर वाला', 'बॉम्बे टॉकिज', 'ए मॅटर ऑफ इनोसन्स', 'सॅमी अॅण्ड रोझी गेट लेड', 'द डिसिव्हर्स', 'बुलिव्हर्स ट्रॅव्हल्स' या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं मुंबईत निधन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा