Advertisement

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं मुंबईत निधन


ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं मुंबईत निधन
SHARES

ज्येष्ठ बाॅलिवूड अभिनेते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शशी कपूर यांचं मुंबईत सोमवारी दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या ७९ व्या वर्षी कोकीळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात मुलगी संजना, मुलगे कुणाल आणि करण असं कुटुंब आहे. 

त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांचे पुतणे ऋषी कपूर दिल्लीतील शुटींग सोडून त्वरीत मुंबईला रवाना झाले. मागील काही दिवसांपासून शशी कपूर आजारी होते. त्यांच्यावर बायपास सर्जरीही करण्यात आली होती.

पृथ्वीराज कपूर यांचे सर्वात धाकटे पुत्र असलेल्या शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ मध्ये झाला. राज कपूर, शम्मी कपूर यांच्याप्रमाणे त्यांनाही लहानपणीच अभिनयाचं बाळकडू मिळालं. शशी यांनी १९४० मध्ये बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. शशी यांनी आपल्या चंदेरी कारकिर्दीत एकूण ११६ सिनेमांमध्ये काम केलं त्यांपैकी ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

त्यांच्या अभिनयातील योगदानाबद्दल २०११ मध्ये केंद्र सरकारने त्यांचा पद्मभूषण देऊन गौरव केला. तर, २०१५ मध्ये त्यांना मानाच्या २०१४ चा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.  
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा