Advertisement

विद्या बालनचा चित्रपट 'शकुंतला देवी' अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज

मानवी कम्प्युटरम्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

विद्या बालनचा चित्रपट 'शकुंतला देवी' अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज
SHARES

लॉकडाऊनच्या दरम्यान विद्या बालन (Vidya Balan) स्टारर 'शकुंतला देवी' (Shakuntala Devi) हा चित्रपट आता थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार असल्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. हा चित्रपट लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या आणि चित्रपटाशी संबंधित इतर लोकांनी शुक्रवारी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. मात्र अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

विद्यानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'हे सांगताना मला आनंद होतोय, तुम्ही लवकरच आपल्या प्रियजनांसोबत प्राइम व्हिडिओवर' शकुंतला देवी' बघू शकणार आहात. अशा अभूतपूर्व काळातही आम्ही तुमचे मनोरंजन करू शकू, याबद्दल आम्ही उत्साहित आहोत #WorldPremierOnPrime # शकुंतलादेवीऑनप्राइम'

मानवी कम्प्युटरम्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात विद्यासह सान्या मल्होत्रा आणि अमित साधदेखील दिसणार आहेत. सान्या शकुंतला देवीची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका साकारत आहे. तर अमित शकुंतला देवी यांचा जावई अजय यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचं शूटिंग गेल्या वर्षी लंडनमध्ये सुरू झालं होतं.

शकुंतला देवी एक गणितज्ञ होत्या. गणितावरच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांचं नाव १९८२ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं होतं. त्यांनी नॉवेल, गणितावर आधारित पुस्तके, पजल आणि एस्ट्रोलॉजीवर अनेक पुस्तकेदेखील लिहिली. मात्र त्यांचे 'द वर्ल्ड ऑफ होमोसेक्सुअल्स' या पुस्तकाला भारतात होमो सेक्युलिटीवर आधारित अभ्यासासाठी उत्तम माहिती पुस्तक म्हणून ओळखलं जातं.

शकुंतला देवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षांच्या शकुंतलाला कार्ड्स ट्रिक शिकवताना त्यांनी आपल्या मुलीची नंबर लक्षात ठेवण्याची क्षमता ओळखली आणि शकुंतलाच्या प्रतिभेच्या बळावर रोड शो सुरू करण्यासाठी सर्कस सोडली.

हिंदी सिनेमातला हा पहिला असा सिनेमा आहे, ज्यात दिग्दर्शनापासून ते लेखन, मुख्य भूमिकेपर्यंत महिलांनी काम केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनु मेनन यांनी केलं असून त्यांनी नयनिका महतानी यांच्यासह पटकथा लिहिली. चित्रपटाचं संवाद लेखन इशिता मोईत्रांनी केलं आहे.



हेही वाचा

अमिताभ-आयुष्मान यांची 'गुलाबो सिताबो' अमेजॉन प्राइम होणार प्रदर्शित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा