Advertisement

अभिनंदन, विराट-अनुष्काला मुलगी झाली हो!

अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे.

अभिनंदन, विराट-अनुष्काला मुलगी झाली हो!
SHARES

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पालक बनले आहेत. अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे. विराट कोहली आपल्या मुलीच्या जन्मापूर्वी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरुन भारतात परत आला आहे आणि तो अनुष्कासोबत आहे.

विराट कोहलीनं ट्विटरवर ही चांगली बातमी शेअर केली आणि लिहिलं की, “आम्हाला जाहीर करण्यात प्रचंड आनंद होतो आहे. आम्हाला मुलगी झाली आहे. आमच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरू झालं आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहे. पण या क्षणी आमचं खासगीपण जपण्याच्या अधिकाराचा आपण सगळे मान राखाल."

विराटनं ११ डिसेंबर २०१७ रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काशी इटलीत लग्न केलं. इटलीतील लग्नासाठी खूप जवळचे मित्र आणि काही नातलगांना आमंत्रित केलं होतं.

विराट कोहली, अनुष्का शर्मा भारतातील सर्वात जास्त चर्चेत असणारं जोडपं आहे. लवकरच आई वडील होणार हे या दोघांनी जाहीर केलं, तेव्हापासून या दोघांच्या होणाऱ्या बाळाची चर्चा होती. विरुष्काने हे जाहीर केलं तेव्हा खरं तक देशात Coronavirus आणि लॉकडाऊनची भीती होती. तरीही सोशल मीडियावर सर्वांत ट्रेंड होणारा विषय हाच होता.

अनुष्का शर्मानं गरोदरपणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नुकतंच अनुष्का शर्मानं एका मॅगझिनसाठी फोटोशूटही केलं आहे. त्याचे फोटो अजूनही चर्चेचा विषय ठरलेले आहेत. या फोटोंमध्ये ती आपले बेबी बंप (Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसली. त्यावरून तिचं कौतुक झालं आणि टीकाही झाली.हेही वाचा

मुंबई महापालिकेविरोधात सोनू सूद हायकोर्टात

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली कोरोनावरील लस, ठरली पहिलीच भारतीय सेलिब्रिटी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा