Advertisement

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली कोरोनावरील लस, ठरली पहिलीच भारतीय सेलिब्रिटी

लसीकरण मोहिमेत सहभागी होत बाॅलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने कोरोनावरील लस घेतली आहे.

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली कोरोनावरील लस, ठरली पहिलीच भारतीय सेलिब्रिटी
SHARES

मागील वर्षभरापासून जगभर उच्छाद घालणाऱ्या कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी विविध देशांमध्ये कोरोनावरील लसीकरणाला आपत्कालीन पातळीवर सुरूवात करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत सहभागी होत बाॅलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने कोरोनावरील लस घेतली आहे. 

या लसीकरणानंतर कोरोनावरील लस घेणारी शिल्पा पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. भारतात अद्याप लसीकरणाला सुरूवात न झाल्याने शिल्पाने दुबईमध्ये कोरोनावरील लस घेतली आहे. शिल्पा चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. शिल्पाने लस घेतनाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पाने लसीकरणाचा एक फोटो शेअर करत कोरोना लस घेण्याचा अनुभव सांगितला आहे. शिल्पाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मास्क आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातल्याचं दिसत आहे. ‘मी लस घेतली आहे आणि सुरक्षित… न्यू नॉर्मल… २०२१ मध्ये आले’, अशी कॅप्शन तिने फोटोला दिली आहे.

शिल्पाने ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘आंखे’, ‘बेवफा सनम’, ‘खुदा गवाह’ अशा अनेक हिट हिंदी सिनेमांमध्ये नायिका म्हणून काम केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शुक्रवारपासून कोरोना लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात एका आरोग्य संस्थेत ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. 

मुंबईमध्ये कूपर रुग्णालयात 'ड्राय रन'ला सुरूवात झाली आहे. तर, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणाची 'ड्राय रन' घेण्यात येत आहे. या 'ड्राय रन'मध्ये राज्य शासकीय कर्मचारी, आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी सहभागी झाले आहेत. 


हेही वाचा-

नव्या कोरोना रुग्णांबद्दल आरोग्यमंत्री म्हणाले...

कोरोना लसीची 'इतकी' असेल किंमत, अदर पुनावाला यांनी जाहीर केला दर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा