Advertisement

नव्या कोरोना रुग्णांबद्दल आरोग्यमंत्री म्हणाले...

राज्यात जे ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. त्यांच्या संपर्कातील कोणीही व्यक्ती अद्याप तरी पॉझिटिव्ह आढळलेला नाही.

नव्या कोरोना रुग्णांबद्दल आरोग्यमंत्री म्हणाले...
SHARES

राज्यात कोरोनाच्या (coronavirus) नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. सद्यस्थितीत तरी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कुणीही पाॅझिटिव्ह नाही, अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या कोरोनाच्या प्रकाराबद्दल बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, नव्या प्रकाराच्या कोरोनाचा विषाणू ७० टक्के अधिक वेगाने पसरू शकतो. त्यामुळे हा विषाणू अत्यंत घातक असून त्याचा संसर्ग टाळण्यासाठी सजग राहून अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 

राज्यात जे ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. त्यांच्या संपर्कातील कोणीही व्यक्ती अद्याप तरी पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोणी पॉझिटिव्ह आढळला तरी त्याला काेरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालाय का हे आधी तपासावं लागेल, अशी माहिती राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

हेही वाचा- चिंतेत वाढ! महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे ८ रूग्ण आढळले

महाराष्ट्रात (maharashtra) सध्या दिवसाला दोन ते अडीच हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. याआधी दिवसाला २१ हजारापर्यंत रुग्ण सापडत होते. राज्यातील मृत्यूदरदेखील कमी झाला आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासंबंधी नियमावली करण्यात आली होती. त्यानुसार या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक क्वारंटाइनची सक्ती करण्यात आली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरात क्वारंटाइन होण्यास सांगितलं होतं. राज्य सरकारने काळजी घेण्यामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. 

मात्र काही प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून देशांतर्गत विमानानेही प्रवास करत असल्याने अशा संशयीत रुग्णाची ओळख पटवणं कठीण जात आहे. येत्या ७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून त्यात अनेक मुद्दे, त्रुटी केंद्राच्या लक्षात आणून देणार आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.  

राज्यात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचं सक्तीने पालन करण्यात येत आहे. या नियमानुसारच ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना (covid19 vaccination) लसीकरणासाठी ड्राय रन होणार आहे. त्यातून लसीकरण यंत्रणा कशी काम करते हे कळून येईल. तसंच त्रुटी देखील दूर करता येतील. पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय तपासता येईल. जेणेकरून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होताच कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागू नये, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

(maharashtra health minister rajesh tope gives update on new coronavirus strain patients)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा