Advertisement

डिसेंबरमध्ये अँटिजेन चाचण्याच्या प्रमाणात घट

डिसेंबर महिन्यात करण्यात आलेल्या ४.४८ लाख कोरोना चाचण्यांपैकी २.२१ लाख अँटिजेन चाचण्या असल्याची माहिती समोर येत आहे.

डिसेंबरमध्ये अँटिजेन चाचण्याच्या प्रमाणात घट
SHARES

डिसेंबर महिन्यात करण्यात आलेल्या ४.४८ लाख कोरोना चाचण्यांपैकी २.२१ लाख अँटिजेन चाचण्या असल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात ३.७१ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात १.६८ लाख अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. तर सप्टेंबर महिन्यात ३.५१ लाख कोरोना चाचण्यांपैकी १.०९ अँटिजेन चाचण्या होत्या. यावरून आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण मागील काही महिन्यांत कमी झाल्याचं समोर आलं आहे.

चाचणीची टक्केवारी

  • सप्टेंबर महिन्यात ६९ टक्के
  • ऑक्टोबर महिन्यात ६० टक्के
  • नोव्हेंबर महिन्यात ५५ टक्के
  • डिसेंबर महिन्यात ५० टक्के

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १०० व्यक्तींमागे पॉझिटिव्हिटी दर १० ते १२ टक्के आहे. हे प्रमाण अँटिजेन चाचण्यांमध्ये ३ ते ४ टक्के इतके आहे. दर दिवसाला मुंबईत १२ ते १९ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीनं दर दिवशी १५ हजार आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. पॉझिटिव्हिटी दरावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊन अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत.

अँटिजेन चाचण्यांचा वापर वाढला आहे यात काही चूक नाही; मात्र अचूक निदानासाठी आरटीपीआर चाचण्या होणं गरजेचं आहे. विक्रेते, फेरीवाले आणि दुकानदार यांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. त्यासाठी अँटिजेन चाचण्या फायदेशीर ठरतात. त्यांचे अहवाल लवकर मिळतात. आरटीपीसीआरबाबत अत्याधुनिकता आणून त्यांचे अहवाल लवकर मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा