Advertisement

चिंतेत वाढ! महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे ८ रूग्ण आढळले

नव्या कोरोनाचे ८ रूग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच यासंदर्भातील माहिती ट्विट करून दिली आहे.

चिंतेत वाढ! महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे ८ रूग्ण आढळले
SHARES

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा अवतार समोर आल्यानंतर या विषाणूचा फैलाव इतरत्र कुठेही होऊ नये यासाठी जगभरात दक्षता घेतली जात आहे. मात्र या नव्या कोरोनाचे (coronavirus) ८ रूग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच यासंदर्भातील माहिती ट्विट करून दिली आहे.

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मिरा-भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे.

हेही वाचा- कोरोना लसीची 'इतकी' असेल किंमत, अदर पुनावाला यांनी जाहीर केला दर

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये जनुकीय संरचनेत बदल झालेल्या कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. त्यानंतर ब्रिटनमध्ये पुन्हा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलं. तर भारत-ब्रिटनमधील विमानसेवाही खंडीत करण्यात आली होती. सुपर स्प्रेडर प्रकारात मोडणाऱ्या या नवीन विषाणूचा संसर्ग ७० टक्के अधिक वेगाने पसरतो, अशी माहिती ब्रिटन सरकारने दिली आहे.

भारत सरकारने गेल्या काही दिवसांत ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांची 'जिनोम सिक्वेंसिंग' करण्याचा निर्णय घेतला आहे. विषाणूने जनुकीय संरचना बदलली आहे का, हे ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे 'जिनोम सिक्वेंसिंग'. तज्ज्ञांच्या मते, "यामुळे व्हायरस कुठे आणि किती पसरला याची महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.

कोरोनासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीचा नवीन स्ट्रेनवर परिणाम होणार की नाही, असे प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले आहेत. परंतु लशीमुळे शरीरात अॅंटीबॉडी तयार होतात. त्यामुळे कोरोनाविरोधातील लस नक्कीच प्रभावी असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

(new coronavirus strain patients found in maharashtra says health minister rajesh tope)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा