Advertisement

रोज १२ हजार मुंबईकरांना मिळणार कोरोना लस

कोरोनावरील लस पालिकेस उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासात लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे. लसीकरणासाठी मुंबईतील आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे.

रोज  १२ हजार मुंबईकरांना मिळणार कोरोना लस
SHARES

मुंबई पालिकेने कोरोना लसीकरणासाठी पूर्ण तयारी केली आहे. रोज १२ हजार मुंबईकरांना लस देण्याचं उद्दिष्ट पालिकेने ठेवलं आहे. 

कोरोनावरील लस पालिकेस उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासात लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे. लसीकरणासाठी मुंबईतील आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्या ठिकाणीही आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याचं काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सव्वा लाख कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

तर दुसऱ्या टप्प्यांत पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर घटकांतील कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यांत सुमारे ५० लाख मुंबईकरांना लस दिली जाणार आहे. त्यात ५० वर्षे वयोगटातील ३० लाख नागरिकांचा समावेश असेल. या टप्प्यात अल्पवयीन मुलांनादेखील लस दिली जाणार आहे.

केईएम, नायर, कूपर, सायन रुग्णालयात रोज दोन हजार जणांना लस दिली जाणार आहे. वांद्रेतील भाभा रुग्णालय, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील चार केंद्रात रोज प्रत्येकी एक हजार व्यक्तींना लस दिली जाणार आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा