Advertisement

कोरोना लसीची 'इतकी' असेल किंमत, अदर पुनावाला यांनी जाहीर केला दर

कोरोना लसीसाठी किती पैसे मोजावे लागतील चर्चाही सर्वसामान्यांमध्येही सुरू आहे. कोरोना लसीच्या किमतीबाबत आता सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

कोरोना लसीची 'इतकी' असेल किंमत, अदर पुनावाला यांनी जाहीर केला दर
SHARES

सीरम संस्थेने उत्पादित केलेल्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास रविवारी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच लसीकरणाला सुरूवात होणार आहे.  कोरोना लसीसाठी किती पैसे मोजावे लागतील चर्चाही सर्वसामान्यांमध्येही सुरू आहे. कोरोना लसीच्या किमतीबाबत आता सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

केंद्र सरकारने रिटेलमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली तर कोरोनाची लस १००० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर दुसरीकडे ही लस आपण सरकारला २०० रुपयांमध्ये देत असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं आहे.

पुनावाला म्हणाले की, सीरम केंद्र सरकारला कोरोना लसीचे १० कोटी डोस देणार आहे. केंद्र सरकारला प्रत्येक डोससाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. यानंतर टेंडर काढले जातील आणि किंमतीतही बदल होईल. मला एक स्पष्ट करायचं आहे की, जे काही आम्ही सरकारला देणार आहोत ते लोकांना मोफत दिलं जाणार आहे. तर जेव्हा आम्ही खासगी मार्केटमध्ये याची विक्री करू तेव्हा प्रत्येक डोसची किंमत १००० रुपये इतकी असेल. तसेच लसला बूस्टर डोसची आवश्यकता असल्याने याची एकूण किंमत २ हजार रुपये असेल.

अदर पुनावाला यांनी सांगितलं की, सीरमकडे कोरोना लसीचे पाच कोटी डोस उपलब्ध आहेत.पुढील सात ते दहा दिवसांत सर्व औपचारिकता पूर्ण होतील आणि आम्ही एका महिन्यात पुरवठ्यासाठी सात ते आठ कोटी लसींची निर्मिती करू.आम्ही लसीची निर्यात किंवा खासगी मार्केटमध्ये विक्री करु शकत नाही. केंद्र सरकारने आम्हाला तसं सांगितलं असून आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावी लागणार आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा