Advertisement

सारा अली खानचा डबल रोल, धनुष-अक्षयसोबत करणार रोमांस

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान स्टारर या चित्रपटाची घोषणा झाली आहे. यात सारा डबल रोल साकारेल...

सारा अली खानचा डबल रोल, धनुष-अक्षयसोबत करणार रोमांस
SHARES

दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाविषयी बर्‍याच गोष्टी समोर आल्या आहेत. अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान स्टारर या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. या कलाकारांच्या व्यक्तिरेखांविषयी माहिती देण्यात आलेली नसली तरी अनेक अफवा सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहेत.

अशी चर्चा अशी होती की, अक्षय कुमार 'अतरंगी रे' मध्ये एक कॅमिओ करणार आहे आणि सारा अली खान आणि धनुष एकत्र रोमांस करताना दिसतील. या दोघांची जोडी वेगवेगळ्या धर्माची असेल. तथापि, दिग्दर्शक आनंद एल राय यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अक्षय या चित्रपटात कॅमिओ नव्हे तर महत्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे


साराचा डबल रोल

आता नव्या बातमीनुसार सारा अली खान या चित्रपटात डबल रोल करताना दिसू शकेल. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सारा अली खान 'अतरंगी रे' मध्ये दुहेरी भूमिकेत असून अक्षय कुमार आणि धनुष यांच्या सोबत दोन वेगवेगळ्या काळात रोमांस करताना दिसणार आहे. यात साराचे पात्र बिहारचे आणि धनुषचे पात्र दक्षिणेकडिल दाखवण्यात आले आहे. या दोघांची क्रॉस कल्चर लव्ह स्टोरी दर्शवली जाईल. तर अक्षय कुमारसोबत देखील सारा अली खान रोमांस करताना दिसणार आहे. या दोघांची कहाणी वेगळ्या युगाची असेल


अक्षयचा खास लुक

सारा या चित्रपटात डबल रोल करणार आहे. यासोबतच तिन्ही कलाकारांचे लुक बदलेले दिसून येतील. चित्रपटात अक्षयचा खास लूक पाहायला मिळणार आहे. सुत्रांनी मुंबई मिररला सांगितलं आहे की, 'सारासाठी ही दुहेरी भूमिका असेल. यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या बाजू दर्शवल्या जातील. अक्षय आणि धनुषच्या व्यक्तिरेखांमध्येही त्यांची स्वतःची खासियत आहे.


शूटिंगला लवकरच सुरुवात

सारा अली खान आणि धनुष मार्चमध्ये 'अतरंगी रे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतील. त्याचबरोबर एप्रिलमध्ये अक्षय कुमार त्याच्या शूटिंगला सुरुवात करेल. या चित्रपटाला ८० ते ९० दिवसांमध्ये म्हणजे जून २०२० पर्यंत पूर्ण कण्याची योजना आहे. आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेल्या 'अतरंगी रे' या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार आणि भूषण कुमार करणार आहेत.

दिग्दर्शक आनंद देखील बिहार आणि मधुराई इथं शूटिंग करण्यासाठी लोकेशन शोधत आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होईल.हेही वाचा

अनन्या पांडेची साऊथ चित्रपटात एन्ट्री, अर्जुन रेड्डी फेम हिरोसोबत झळकणार

अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी'ची तारीख बदलली, आता 'या'दिवशी प्रदर्शित होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा