Advertisement

'तानाजी' यूपीत टॅक्स फ्री, महाराष्ट्रात कधी?


'तानाजी' यूपीत टॅक्स फ्री, महाराष्ट्रात कधी?
SHARES

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तानाजी - 'द अनसंग वॉरियरया चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तानाजी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

अजय देवगणनं देखील ट्विटरच्या माध्यमातून युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. 'यूपीत करमुक्त केलेला तानाजी चित्रपट तुम्हीही अवश्य बघा. मलाही आनंद वाटेल', असं आवाहनही देवगणनं सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांना केलं आहे.

अजय देवगणनं ट्विटरवर आभार मानताच ट्वीटरवर ThankYouYOGIji हा हॅशटॅग ट्रँड झाला. त्यानंतर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. 

 

'तानाजी' चित्रपटानं तीन दिवसांतच तब्बल ६१. ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर चित्रपट असाच पुढेही सुपरहिट होत राहिला, तर यावर्षीचा तानाजी हा चित्रपट पहिला ब्लॉकबस्टर ठरू शकतो. तानाजी हा चित्रपट मराठा साम्राज्यातील सरसेनापती सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या चरित्रावर आधारित आहे.


चित्रपटात अजय देवगणनं मुख्य भूमिका साकारली आहे. तसंच काजोल, शरद केळकर, सैफ अली खान हे कलाकार अन्य भूमिका साकारताना दिसतात. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. तर तानाजी चित्रपटासोबतच दीपिकाचा छपाक प्रदर्शित झाला होता. छपाकला देखील छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये करमुक्त करण्यात आलं होतं



हेही वाचा

रामदेव बाबांनी दिला दीपिका पदुकोणला 'हा' सल्ला

डॉक्टरांना भेटल्यानंतर अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा