Advertisement

मुंबईत उघडलेल्या भारतातील पहिल्या Apple Store बाबत जाणून घ्या रंजक गोष्टी

मुंबईत उघडलेल्या या पहिल्या वहिल्या भारतातील ॲपल स्टोरबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात...

मुंबईत उघडलेल्या भारतातील पहिल्या Apple Store बाबत जाणून घ्या रंजक गोष्टी
SHARES

जगातील सर्वात प्रसिद्ध मोबाईल ब्रँड ॲपलचं बहुचर्चित असं भारतातील पहिलं रिटेल स्टोअर मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आजपासून सुरू झालं आहे.

ॲपलचं हे मुंबईतील स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारखं भव्य दिसत आहे. त्यामुळे आता भारतात राहणाऱ्या ॲपल लव्हर्सना थेट ॲपल रिटेल स्टोरमधून खरेदी करता येणार आहे.

मुंबईत उघडलेल्या या पहिल्या वहिल्या भारतातील ॲपल स्टोरबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात...

  • मुंबईची बीकेसी येथे खोलण्यात आलेलं हे Apple Store मुंबईतीलच नाही तर भारतातील पहिलं Apple Store आहे. त्यामुळे ग्लोबल अनुभव मिळेल.
  • जगभरातील Apple Store हे त्यांच्या डिझाइनसाठी ओळखले जातात आणि तेच समोर ठेवून या स्टोअरमधील डिझाईन करण्यात आली आहे.
  • सिलिंगवर १,००० टाइल्स असून प्रत्येक टाइल लाकडाच्या 408 तुकड्यांपासून बनविली गेली आहे.
  • दोन दगडी भिंती याठिकाणी आहेत. ज्याची दगडं ही राजस्थानमधून आणली आहेत.
  • विशेष म्हणजे या Apple BKC च्या स्टोअरमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि ते एकत्रितपणे 20 वेगवेगळ्या भाषा बोलतात.
  • स्टोरमध्ये जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
  • या ठिकाणी विविध प्रक्रियांसाठी जीवाश्म इंधनाचा वापर कमी होणार असून स्टोअर कार्बन न्यूट्रल असून 100 टक्के अक्षय ऊर्जेवर चालणार आहे.
  • ॲपल ट्रेड इन प्रोग्राम. यातंर्गत याठिकाणी खरेदीदार त्यांचे जुने iPhone, Mac, iPad नवीन डिव्हाईस घेण्यासाठी एक्सचेंज करू शकतात. हाच ट्रेड इन प्रोग्राम Apple BKC येथे देखील उपलब्ध आहे.



हेही वाचा

पर्यटन स्थळांच्या यादीत कान्हेरी लेणी, वज्रेश्वरी मंदीराचा समावेश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा