Advertisement

लग्नाआधीच नवरी पळून गेल्यास मिळेल विमा, जाणून घेऊया लग्न विम्याबद्दल

लग्नापूर्वीच जर नवरी किंवा नवरदेव पळून गेले, लग्नाच्या वेळी दागिने चोरीला गेले, लग्नाच्या वेळी काही तोटा झाला तर अशा परिस्थितीत लग्न मोडते. त्यामुळे लग्नाच्या तयारीसाठी केलेला खर्च वाया जातो.

लग्नाआधीच नवरी पळून गेल्यास मिळेल विमा, जाणून घेऊया लग्न विम्याबद्दल
SHARES

आपण आतापर्यंत कार, आरोग्य आणि जीवन विमाबद्दल ऐकले असेलच. पण आता भारतात लग्नाचा विमा देखील सुरू झाला आहे. देशातील अनेक बड्या आणि नामांकित विमा कंपन्या लग्नाचा विमा करतात. आम्ही आपल्याला लग्न विमा (वेडिंग इन्शुरन्स) याबद्दल सांगणार आहोत. 

भारतीय लोक लग्नात बरेच पैसे खर्च करतात. तुम्ही बरेचदा ऐकले असेल की, लग्नापूर्वीच जर नवरी किंवा नवरदेव पळून गेले, लग्नाच्या वेळी दागिने चोरीला गेले, लग्नाच्या वेळी काही तोटा झाला तर अशा परिस्थितीत लग्न मोडते. त्यामुळे लग्नाच्या तयारीसाठी केलेला खर्च वाया जातो. परिणामी मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत होणारं नुकसान तुम्ही लग्न विमा घेऊन भरून काढू शकता. 

बर्‍याच कंपन्या आता लग्नाचा विमा देत आहेत. भारतात आयसीआयसीआय लोम्बार्ड, फ्यूचर जनरल, ओरिएंटल इन्शुरन्स, बजाज अलियान्झ सारख्या कंपन्या लग्नाचा विमा देतात. विमा कंपन्यांकडे लग्नासाठी अनेक प्रकारच्या पॉलिसी तयार असतात. आपण आपल्या गरजेनुसार पॅकेज निवडू शकता.

लग्न विमामध्ये या बाबी होतात कव्हर

- केटररला दिलेले अ‍ॅडव्हान्स 

- लग्नासाठी बुक केलेले हॉल किंवा रिसॉर्टसाठी अॅडव्हान्स दिलेले पैसे

- ट्रॅव्हल एजन्सींना दिलेले अ‍ॅडव्हान्स 

- हॉटेलची अ‍ॅडव्हान्स बुकिंग पेमेंट

- लग्न पत्रिकाचा खर्च

- सजावट आणि संगीतासाठीचा खर्च

- लग्नाच्या सजावटीचा खर्च

या गोष्टी लक्षात ठेवा

विमा घेताना पॉलिसीमध्ये काय समाविष्ट केले जाईल त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा. जर एखाद्याकडे आधीपासून विमा संरक्षण असेल तर हे कव्हर कसे उपलब्ध असेल ते अगोदरच जाणून घ्या. इतर विमा पॉलिसींप्रमाणेच लग्न विम्यातील सर्व गोष्टी उघड करणे आवश्यक आहे. लग्नाला कोण उपस्थित राहेल, किती लोक येतील, लग्न पत्रिकेची प्रत, लग्नाचं ठिकाण, लग्नाची वेळ आदी सर्व सांगणं आवश्यक आहे. जर लग्नाची जागा बदलली तर त्याबद्दलही माहिती द्यावी लागेल.

विमा कंपनीला लग्नाच्या ठिकाणातील सजावट, रंगमंच, दागिने इत्यादींवर किती खर्च झाला आहे हे देखील सांगावे लागेल. यानुसार विमा रक्कम निश्चित केली जाईल. विमा कंपनी आपल्याला अनेक पर्याय देऊ शकते. आपण आपल्या बजेट आणि आवश्यकतेनुसार त्यापैकी एक निवडू शकता.

कोणत्याही प्रकारची चोरी असल्यास पोलिसांना कळवा. एफआयआरची प्रत विमा कंपनीला द्यावी लागेल. कंपनीला माहिती देण्याशिवाय तुम्हाला क्लेम फॉर्म भरावा लागेल. तोट्याचा तपशील भरावा लागतो. किती हरवले हे सांगण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील. त्यानंतर विमा कंपनी त्याचे मूल्यांकन करेल.

प्रीमियम

लग्नाच्या विम्याची विमा रक्कम आपणास किती इन्‍शुअर केली यावर अवलंबून असते.  प्रीमियम आपल्या विम्याच्या रकमेच्या केवळ ०.७ टक्के ते २ टक्के असतो.  उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे १० लाख रुपयांचा विवाह विमा असेल तर तुम्हाला ७,५०० ते १५,०० रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.

लग्न रद्द झाल्यानंतरही कव्हर 

जर लग्न अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे रद्द झाले असेल किंवा लग्नाची तारीख पुढे गेली असेल तरीही लग्नाचा विमा मिळतो.

या गोष्टी कव्हर करत नाहीत

लग्नाच्या वेळी दहशतवादी हल्ला, लग्न अचानक रद्द करणे, वर किंवा वधूचे विमान किंवा ट्रेन चुकल्यास, संप, वधू किंवा वर यांचे अपहरण, लग्नाचे ठिकाण अचानक बदलणे, कोणताही विद्युत किंवा यांत्रिक बिघाड किंवा स्वतःला हानी पोचवल्यास विम्यासाठी दावा करता येणार नाही.हेही वाचा -

१ नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया बदलणार

पीएफसाठी आता व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन सेवा


संबंधित विषय
Advertisement