Advertisement

मिरा-भाईंदर शहरात रविवारी COVID-19 चे १० नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

मिरा-भाईंदर शहरात (Mira-Bhayandar) रविवारी कोरोनाचे (Coronavirus) १० नवी रुग्ण आढळून आले आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने (MBMC) दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे रविवारी एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे.

मिरा-भाईंदर शहरात रविवारी COVID-19 चे १० नवे रुग्ण, एकाचा मृत्यू
SHARES
Advertisement

मिरा-भाईंदर शहरात (Mira-Bhayandar) रविवारी कोरोनाचे  (Coronavirus) १० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने (MBMC) दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे रविवारी एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. 

त्यामुळे मिरा-भाईंदर शहरात आतापर्यंत COVID-19 चे एकूण ४९९ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी ६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. एकूण ३०३ जणांना घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिके (MBMC) ने महापालिका शहरात २२ मे पर्यंत पूर्णत: लाॅकडाऊन ठेवला होता. त्यानंतर त्यात सवलत देऊन दुकानांच्या वेळा निश्चित केल्या. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून गर्दी टाळता येईल.

मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या निर्देशानुसार शहरातील दुकाने पुढील वेळेत बंद/ सुरू राहतील.

आस्थापनावेळ
मासळी, मटण/चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने
२१/५/२०२० रात्री १२.०० वाजेपासून २६/५/२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व मनपाने तात्पुरती सुरू केलेली भाजीपाला व फळांची दुकाने/ मार्केट -
२१/५/२०२० रात्री १२.०० वाजेपासून २६/५/२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
अन्नधान्याची दुकाने (डी मार्ट, स्टार बाझार, बिग बाझार इ. शाॅपिंग माॅलसह) बेकरी इ. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने
उपरोक्त काळात दररोज सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू राहील.
अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बेकरी, दूध, मासळी, चिकन, मटण व इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा (home delivery)
उपरोक्त काळात दररोज सकाळी ९.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील.
दूध व डेअरी आस्थापना
उपरोक्त काळात दररोज सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील.
औषधांची दुकाने (फक्त औषधे विकण्याची मुभा असेल)
दररोज औषधांची दुकाने सकाळी ९.०० ते संध्याकाळी ९.०० वाजेपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत सुरू राहतील.

रुग्णालयातील (ज्या ठिकाणी आंतररुग्ण विभाग सुरू आहे, अशा ठिकाणी) औषधांची दुकाने २४ तास किंवा त्यांच्या सोयीनुसार सुरू ठेवण्याची मुभा असेल.

२४ तास सुरू ठेवण्याची परवानगी असलेल्या औषधी दुकानांना २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.
पिठाची गिरणी (आटा चक्की)
नेहमीप्रमाणे सुरू राहील.
मच्छिमार व्यवसाय

उपरोक्त काळात दररोज सकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत सुभाषचंद्र बोस मैदानालगत उत्तनकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात नसलेल्या रस्त्याचा अर्धा भाग व त्या लगतच्या फूटपाथवर फक्त मासळी विक्रीसाठी परवानगी राहील.


टीव्ही, ए.सी. वाॅशिंग मशीन इ. इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंची दुरूस्ती दुकाने (इलेक्ट्राॅनिक्स दुकाने वगळून)
हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल दुकाने
उपरोक्त काळात सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.
संबंधित विषय
Advertisement