मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई (mumbai) विभागातर्फे विविध स्थानकांवर "नव दुर्गा" (Nav Durga) पथकाद्वारे विशेष तिकीट तपासणी (tickcet checking) मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई विभागाच्या सर्व महिला तिकीट तपासनीस (All women Special Ticket Checking Batches) तेजस्विनी बॅचेसद्वारे राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून तिकीट-तपासणीच्या प्रयत्नांना बळकटी देत आहेत. योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे.
सर्व महिला तिकीट तपासनीस तेजस्विनी बॅच 1,2, 3, 4 आणि विशेष बॅच मध्ये वर्गीकृत केले आहेत. 1 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सक्रीयपणे तिकीट तपासण्याचे काम चालू होते.
या कालावधीत, बॅचने वैध तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या एकूण 11,971 प्रवाशांना पकडले आहे आणि 33,98,732 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसी लोकलमधील 1860 प्रवाशांकडून 6,48,570 रुपये दंड वसूल केला आहे. तर प्रथम श्रेणीतील 4622 प्रवाशांकडून 14,38,550 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
द्वितीय श्रेणीतील 4664 प्रवाशांकडून 12,15,882 रुपये दंड वसूल केला आहे. बुक न केलेल्या सामानासह 825 प्रवाशांकडून 95,730 रुपये दंड वसूल केला गेला आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट खरेदी करून सुरक्षिक प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे या उपक्रमातून करत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेल्वे प्रशासनाने (CR) सहभागी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
हेही वाचा