Advertisement

खैराणी रोड भागात फरसाणच्या दुकानाला आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू


खैराणी रोड भागात फरसाणच्या दुकानाला आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू
SHARES

साकिनाक्याजवळील खैराणी रोड परिसरातील भानू फरसाण या दुकानाला सोमवारी पहाटे ४.१७ वाजता आग लागल्याने १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीमुळे इमारतीचा काही भाग देखील कोसळल्याने काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


जखमी राजावाडी रुग्णालयात दाखल

आग आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही जणांना बाहेर काढण्यात आलं असून जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ३ फायर इंजिन, ४ जम्बो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.


१२ कामगारांचा मृत्यू

साकीनाका येथील खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये सोमवारी पहाटे भानू नावाच्या फरसाणच्या दुकानाला भीषण आग लागली. यावेळी भानू फरसाण दुकानासह इतर दुकानातील कामगार झोपेत असताना अचानक आग लागली. यामध्ये १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर आगीत अडकलेल्या १५ जणांपैकी ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
 

रूग्णालयात आठ वाजेपर्यंत १२ मृतदेह आणण्यात आले होते. याशिवाय जखमी अवस्थेत अद्याप कोणीही दाखल झालेलं नाहीत. पण आम्ही आमच्या डॉक्टरांना आणि कम॓चार्यांना सत॓क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून जखमी अवस्थेत कोणी आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करता येतील.
- डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा