Advertisement

कुपर रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयात 428 पदे रिक्त


कुपर रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयात 428 पदे रिक्त
SHARES

विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयातल्या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची 208 पदांपैकी तब्बल 138 पदे रिक्त आहेत. एवढेच नव्हे तर महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या कुपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची 290 पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील हंगामी पदांच्या प्रस्ताव मंजुरीला आला असता, या रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना पुरेशा सेवा मिळत नसल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी उपस्थित केला. पालिकेची तीनही प्रमुख रुग्णालये दक्षिण भागात आहे. उपनगरात असलेल्या कुपरचे आधुनिकीकरण केले असले तरी या रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक यांची पदे भरलेली नाहीत. भूलतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, रेडिओलॉजिस्ट यांची पदेही रिक्त आहेत. ही सर्व पदे भरण्यासाठी पालिका काही धोरण आखणार आहे का, असा प्रश्नही राजुल पटेल यांनी उपस्थित केला. या वेळी झालेल्या चर्चेत शुभदा गुडेकर, रईस शेख, मंगेश सातमकर, दिलीप लांडे, संजय घाडी आदींनी चर्चेत सहभागी होऊन प्रशासनाला जाब विचारला.

संबंधित बातम्या - '...तर प्रसुतीगृह बंद करा'

यावर प्रशासनाच्या वतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 208 पदे मंजूर आहेत. त्यामध्ये 138 पदे रिक्त असल्याचे सांगितले. तर कुपर रुग्णालयात एकूण 1 हजार 296 मंजूर पदे आहेत, त्यापैकी 290 पदे रिक्त असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांची पदे ‘एमपीएससी’ मार्फत भरली जात होती. मात्र आता त्यांनी महापालिकेला भरतीसंबंधी मंडळ नेमून डॉक्टरांची नेमणूक करण्यास सांगितले. त्यानुसार ही भरण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही दराडे यांनी म्हटले आहे. 

यापूर्वी केईएम, शीव आणि नायरमधील वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरांना किमान तीन महिने उपनगरीय रुग्णालयांमध्ये काम करण्याचे आदेश दिले होते. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याची कबुली दराडे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा