मुंबईत सोमवारी रात्री ही मुसळधार पावसात मालाडच्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर सुरक्षा भिंत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत ७५ जण जखमी आहेत. जखमीवर जवळील शताब्दी रुग्णालयात दाखल केले असून ढिगाऱ्याखालून मृत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांसह अग्निशमन दलाचे अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत.
रविवारपासून पडत असलेला पावसाने मुंबईत ठिक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे लोकलसह रस्त्यावरील वाहतूक ही ठप्प झाली असताना. मालाडच्या कुरार गाव येथील पिंपरीपाडा परिसरात रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांवर सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या(राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातच चिंचोळ्या गल्या आणि पावसामुळे कामात असंख्य अडचणी येत असताना, त्यात बघ्यांची गर्दीची भर पडली होती.
या दुर्घटनेत आता पर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला ७५ जखमींना तातडीने कांदिवलीच्या शताब्दी व जोगेश्वरीच्या ट्रामा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या १३ रुग्णांमधील ३ ते ४ जणांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अद्याप ही ढिगाऱ्या खाली अडकलेल्यांचा शोध सुरू असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.