Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये गुरुवारी १७१ नवे रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

मिरा-भाईंदर शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३६०९ झाली आहे. तर आतापर्यंत १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये गुरुवारी १७१ नवे रुग्ण, ४ जणांचा मृत्यू
SHARES

मिरा-भाईंदरमध्ये शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. गुरुवारी मिरा-भाईंदरमध्ये सर्वाधिक १७१ रुग्ण आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भाईंदरच्या नवघर रोड, बीपी रोड, खारे गाव, आरएनपी पार्क, राहुल पार्क, एस. व्ही रोड, नर्मदा नगर, केबिन रोड, राई गाव व म्हात्रे रोड परिसरात ११३ रुग्ण आढळले आहेत. तर, मिरा रोडच्या काशिगाव, पेणकर पाडा, साई कॉम्प्लेक्स, जनता नगर झोपडपट्टी, पूनम सागर, शांती नगर, साई बाबा नगर, नया नगर व हटकेश या परिसरातही ५८ रुग्ण आढळले आहेत.

मिरा-भाईंदर शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३६०९ झाली आहे. तर आतापर्यंत १४९ रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. गुरूवारी १५० रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता २६४८ झाली आहे.

६ जून रोजी मीरा भाईंदर महानगरपालिकेने मीरा-भाईंदरमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत अनावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु आता १ जुलै ते १० जुलै पर्यंत येथे संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे.


हेही वाचा -

Mumbai Containment Zones : 'ही' आहे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी

Mumbai Containment Zones : 'ही' आहे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा