Advertisement

Coronavirus: मुंबईत कोरोनाचे 1725 नवे रुग्ण, दिवसभरात 39 जणांचा मृत्यू


Coronavirus:  मुंबईत कोरोनाचे 1725 नवे रुग्ण, दिवसभरात 39 जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, राज्यात मागील 24 तासात कोरोनाचे 58 जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मुंबईत  दिवसभरात 1725 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत  रविवारी दिवसभरात 39 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 988 वर पोहचला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39 रुग्ण दगावले आहेत तर 21 मे रोजी 41 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 22 मे रोजी रोजी एकूण 27 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे 1725 नवीन रुग्ण आढळले आहेत.


मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 30 हजार 359 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 598 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 8 हजार 074 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


मुंबईत  रविवारी झालेल्या 39 मृतांमध्ये 24 रुग्ण दीर्घ कालिन आजाराने ञस्त होते. त्या 39 मृतांमध्ये 20 पुरूष आणि 19 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 4 जणांचे वय हे 40 वर्षाहून कमी होते.तर 16 जणांचे वय हे 60 वर्षाहून अधिक होते. तर उर्वरित 23 जण हे 40 ते 60 वर्षांमधील होते.


कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती


अतिदक्षता विभागातील रुग्ण - 583

व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण -  198

सीसीसी 2 मधील कोरोना रुग्ण - 3658


मुंबईतील कंटेनमेंट झोनची माहिती


कंटेनमेंट झोन (चाळ आणि झोपडपट्टी) - 659

सीलबंद इमारती - 2411

अती जोखीम - 7395

कमी जोखीम 15, 686

सीसीसी 1 मधील अति जोखीम संपर्क - 15, 607

एकूण तपासणी शिबिर - 374

शिबिरात तपासलेले रुग्ण - 22084

एकूण घेतलेले नमूने - 5452

आढळलेले पाँझिटिव्ह रुग्ण - 392



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा