Advertisement

माटुंगा, मुंबादेवीत रोबो, शटर पार्किंगचे १८ मजली वाहनतळ उभारण्यात येणार

पेडर रोड, भुलाभाई देसाई मार्ग येथील पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे लोकार्पण जून २०२१मध्ये करण्यात आले होते.

माटुंगा, मुंबादेवीत रोबो, शटर पार्किंगचे १८ मजली वाहनतळ उभारण्यात येणार
SHARES

माटुंग्याला ४७५, तर मुंबादेवीला ५४६ वाहनक्षमतेची १८ मजल्यांची पार्किंगसाठी वाहनतळे उभारली जाणार आहेत. अत्याधुनिक पद्धतीची शटर आणि रोबो पार्किंग हा पर्याय त्यावर काढण्यात आला आहे.

पेडर रोड, भुलाभाई देसाई मार्ग येथील पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे लोकार्पण जून २०२१मध्ये करण्यात आले. या २१ मजली वाहनतळांमध्ये २४० वाहने पार्क केली जातात. यानंतर आता माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत, तसेच मुंबादेवी मंदिराजवळ स्वयंचलित वाहनतळाची निर्मिती केली जाणार आहे.

शटर आणि रोबो पार्क पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या या वाहनतळांमध्ये सुमारे एक हजार गाड्यांचे पार्किंग होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

या बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर वाहनांची ऑनलाइन नोंदणी होणार असून, एका भव्य पोलादी ‘प्लेट’ वर एक कार उभी करायची. ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने वाहनासह वाहनतळामध्ये प्रवेश करेल.

१८ मजली वाहनतळांमध्ये असणाऱ्या भव्य लिफ्टमध्ये ती गाडी स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाईल. अत्याधुनिक पद्धतीचे शटर आणि रोबो पार्किंग असलेली ही सुविधा मुंबईत अन्य ठिकाणीही वापरली जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

कुठे, किती पार्किंग?

ठिकाण प्रस्तावित वाहनतळाची क्षमता वाहतळाचे बांधकाम

माटुंगा पूर्व,

मध्य रेल्वे स्थानकासमोर ४७५ १८ मजले

मुंबादेवी मंदिराजवळ ५४६ १८ मजले



हेही वाचा

मुंबईकरांसाठी आता ऑनलाईन पार्किंग बुकिंग सेवा

mumbai"="" target="_blank">Mumbai Local News: वांद्रे स्टेशन ते टर्मिनस लवकरच स्कायवॉकद्वारे जोडले जाईल">Mumbai Local News: वांद्रे स्टेशन ते टर्मिनस लवकरच स्कायवॉकद्वारे जोडले जाईल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा