Advertisement

टांझानियातून आलेला धारावीतील एक रुग्ण रुग्णालयात दाखल

पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून मुंबईतील धारावीत आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

टांझानियातून आलेला धारावीतील एक रुग्ण रुग्णालयात दाखल
SHARES

पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून मुंबईतील धारावीत आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. टांझानिया हा देश जोखमीच्या देशांपैकी नसला तरी या व्यक्तीचे नमुने जनकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शिवाय, त्यांच्या निकटच्या संपर्कातील लोकांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत परदेशातून आलेले आणखी ६ प्रवासी बाधित आढळल्यानं आता बाधित प्रवाशांची संख्या १९ झाली आहे. त्यांच्या संपर्कातील ६ जण बाधित असल्याचं आढळलं आहे. नव्यानं बाधित आढळलेल्या प्रवाशांपैकी ३ दक्षिण आफ्रिकेहून, १ मॉरिशस तर उर्वरित युरोप आणि ब्रिटनमधून आले आहेत. अशा एकूण २५ जणांची नमुने जनुकीय तपासणीसाठी दिल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.

सध्या धारावीत दररोज १ ते २ नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर अनेकदा दैनंदिन रुग्णांची संख्या शून्य असते. उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी कमी होत असून सध्या केवळ ५ रुग्ण उपचाराधीन आहेत. 

धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू असतानाच आता जगभरात ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाल्यामुळं महापालिकेची यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले.

त्या व्यक्तीला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानतळावर या व्यक्तीची चाचणी केली असता तो बाधित आढळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते.

त्याचा रहिवासी पत्ता धारावीतील असून तो धारावीत येण्यापूर्वीच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते. या व्यक्तीचे नमुने जनुकीय चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले आहेत. मात्र पालिकेच्या जनुकीय चाचणी यंत्रणेची क्षमता ३८० नमुन्यांची आहे.

तोपर्यंत थांबणे शक्य नसल्यास हे नमुने पुण्याला चाचणीसाठी पाठवले जातील व ४ दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती मिळते. विमानतळावर या व्यक्तीला घेण्यासाठी आलेल्या दोघांच्याही चाचण्या करण्यात आल्या असून त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

टांझानियातून आलेली व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यामुळं मुंबईत परदेशांतून आलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. या सर्व बाधित प्रवाशांवर पालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा