Advertisement

मालाडच्या अक्सा बीचवर 19 जण समुद्रात गेले आणि...

गेल्या आठवड्यात वाकोला सांताक्रूझ परिसरातील पाच मुले जुहू चौपाटीवर बुडाल्याची दुर्घटना घडली होती.

मालाडच्या अक्सा बीचवर 19 जण समुद्रात गेले आणि...
SHARES

जुहू चौपाटीवर पाच मुले बुडल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी मालाड येथील आक्सा चौपाटीवर मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. 

जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे तब्बल १९ पर्यटकांना बुडताना वाचविण्यात यश आले आहे. समुद्रातील नैसर्गिक भोवऱ्याने निर्माण झालेल्या खड्ड्यात पर्यटकांना अक्षरश: पाण्यात खेचून घेतले होते. 

सायंकाळी ४.४५ ते ६.४५ या वेळेत गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली होती. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांना बोलवावे लागले होते. दरम्यान, चेंबूर, मालाड मालवणी, कांदिवली, बोरिवली अशा विविध भागांत राहणारे सुमारे ४०हून अधिक पर्यटक पाण्यात उतरले होते. समुद्रातील ज्या भागात हे पर्यटक गेले होते, तिथे नैसर्गिक भोवऱ्याच्या खड्ड्यात पर्यटक खेचले जाऊ लागले.

त्यावेळी 'दृष्टी लाइफ सेव्हिंग'च्या एकनाथ तांडेल, भरत मानकर, समीर कोळी, मिलन पाटील, प्रसाद बाजी, विराज भानजी, जयेश कोळी या जीवरक्षकांनी पर्यटकांना समुद्राबाहेर पळवून लावले.

मात्र, १९ जण आतमध्ये अडकले होते. त्यांना वाचवण्यात यश आले. १९पैकी दहा जणांची नोंद पोलिसांनी केली असून, नऊ जण पळून गेले, अशी माहिती जीवरक्षकांनी दिली.

गेल्या आठवड्यात वाकोला सांताक्रूझ परिसरातील पाच मुले जुहू चौपाटीवर बुडाल्याची दुर्घटना घडली होती. पालिकेने गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या प्रमुख चौपाट्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

सर्व प्रमुख चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी अग्निशमन दलाकडून कंत्राटी पद्धतीने ९४ जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा