Advertisement

रायगड दरड दुर्घटनेतील मृतांना केंद्राकडून २ लाखांची मदत

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपये सानुग्रह मदत, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

रायगड दरड दुर्घटनेतील मृतांना केंद्राकडून २ लाखांची मदत
SHARES

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपये सानुग्रह मदत, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई इथं दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, याच भागातील साखर सुतारवाडी इथं देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथील घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर याखाली जवळपास ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं.

हेही वाचा- हा’ तर अतिवृष्टीच्या पलिकडचा पाऊस- उद्धव ठाकरे

महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

दरम्यान, गेल्या ४८ तासांत कोकणात ३५० मिमीहून अधिक पाऊस पडला आहे. रत्नागिरी, रायगडसह संपूर्ण कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. परिसरात १०-१२ फूट पाणी साचल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत. जनतेचा जीव धोक्यात आला आहे, तरीही राज्य सरकारला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही.

मुसळधार पाऊस पडला की कोकणात पूरस्थिती निर्माण होते. हवामान खात्याने आधीच अंदाज वर्तवलेला असताना राज्य सरकारकडून वेळीच उपाययोजना होणं गरजेचं होतं. परंतु प्रशासनाला योग्य ते निर्देश सरकारकडून देण्यात आले नाही. कारण या गोष्टीचं गांभीर्यच त्यांना नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा