Advertisement

हा’ तर अतिवृष्टीच्या पलिकडचा पाऊस- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत असून आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलण्याची गरज असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

हा’ तर अतिवृष्टीच्या पलिकडचा पाऊस- उद्धव ठाकरे
SHARES

महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत असून आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलण्याची गरज असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, रायगड आणि कोकणात पूरस्थिती निर्माण झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, गेल्या चार-पाच दिवसांपासून मी महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेत आहे. ज्या ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तिथं बचावकार्य आणि मदतकार्य सुरु आहे. मात्र आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. कारण अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहे. हे अनपेक्षित असं संकट आहे. दरडी कोसळत आहेत, पुराचं पाणी वाढत आहे. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. पुढचे दोन ते तीन दिवस संकट अजूनही कायम राहील.

हेही वाचा- गोवंडीत इमारत कोसळून २ जण ठार

तळई इथं दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवता आलं. पण ३० ते ३५ लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. नागपुरातही अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरु असून याआधी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लष्कर, हवाई दल, नेव्ही. एनडीआरएफ बचावकार्यात उतरले असून सर्वोपतरी मदत केली जात आहे.

पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहे. मात्र, जागोजागी पाणी असल्याने, रस्ते खचल्याने बचावकार्यातही अडचणी येत आहेत. ढगफुटीचा अंदाज कोणी करु शकतं असं मला वाटत नाही. अतिवृष्टीची व्याख्या कुठपर्यंत न्यायची याचा अंदाज कोणाला आलेला नाही. नेमकी ढगफुटी कुठं होऊ शकते हेही कोणी सांगू शकत नाही. एक अंदाज व्यक्त केल्यानंतर आपण खबरदारी घेत आहेत. आता दरडी कोसळणार हा अंदाज कोणी व्यक्त करु शकत नाही, असं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितलं.

डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावं. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आमचं आवाहन आहे. अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे, तिथं कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरानंतर होणारे आजार यासंबंधी सूचना देण्यात आल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा