Advertisement

गोवंडीत इमारत कोसळून २ जण ठार

राज्यात पावसानं हाहाःकार माजवला असतानाच गोवंडीमध्येही एक दुर्घटना घडली आहे.

गोवंडीत इमारत कोसळून २ जण ठार
SHARES

राज्यात पावसानं (mumbai rains) हाहाःकार माजवला असतानाच गोवंडीमध्येही एक दुर्घटना घडली आहे. गोवंडीमध्ये सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास एक इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी आहेत. सध्या या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली असून, युद्धपातळीवर बाचाव कार्याला सुरूवात केली.

गोवंडीतील शिवाजी नगर येथील बॉब्मे रग्णालय परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका, स्थानिक नेतेमंडळी व पोलिसांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेत नेहा परवेज शेख (३५), मोकार झाबीर शेख (८०) यांचा मृत्यू झाला असून, शमशेद शेख (४५) यांची प्रकृती खंबीर असल्याचं समजतं. शिवाय, परवेज शेख (५०), अमिनाब शेख (६०), अमोल धादेई (३८) आणि अमोल सिंग हे जखमी आहेत. त्याचप्रमाणं मोहम्मद फैजल क्यूरेशी (२१), नमरा क्यूरेशी (१७) व शाहीना क्यूरेशी (२६) यांची प्रकृती ठीक असल्याचं रुग्णालयानं स्पष्ट केलं.



हेही वाचा -

लसीकरण पुर्ण झालेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?

एकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा