Advertisement

एकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी

जगभरात अजूनही कोरोनाला हरविण्यासाठी औषधोपचार आणि लसींचं संशोधन सुरू आहे.

एकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी
SHARES

कोरोनाला (coronavirus) आळा घालण्यासाठी संपुर्ण जगभरात लसीकरण केलं जात आहे. लसीकरण हाच कोरोनावर जालीम उपाय असल्यानं लसीकरणही मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. शिवाय, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसींची लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. मात्र, जगभरात अजूनही कोरोनाला हरविण्यासाठी औषधोपचार आणि लसींचं संशोधन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून झायडसनं बनविलेल्या झायकोव्ह-डी (Zycod-D vaccine)लसीची चाचणी देशभरात सुरू आहे.

या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात जे. जे. समूहाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात झायकोव्ह-डी लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती मिळते. या चाचणीसाठी रुग्णालयानं २ हजार ७३७ सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे. लस दिल्याच्या ५ महिन्यांनंतर फक्त २२ लोकांना संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं.

झायकोव्ह-डी ही एक सुईशिवाय घ्यावी लागणारी लस आहे. ही इंट्रा-डर्मल लस आहे. ज्यास स्नायूंमध्ये इंजेक्शनची लावण्याची आवश्यकता नसते. या लसीचे ३ डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा २८ व्या दिवशी आणि तिसरा ५२ व्या दिवशी घ्यावा लागतो. एकावेळी दोन्ही हातांना ०.२ मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जात असल्याची माहिती मिळते.

लस घेतल्यानंतर लोकांना कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे सांगितले. १५ फेब्रुवारी चाचणी सुरू केली असून या चाचणीत केवळ असेच लोक घेतले गेले ज्यांचा आरटीपीसीआर आणि अँटीबॉडीजचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या लस चाचणीचे नुकतेच ५ फॉलोअप पूर्ण केल्याचं समजतं.
हेही वाचा -

राज्याला ड्रायव्हर नको, जनतेचं हित बघणारा मुख्यमंत्री हवाय- नारायण राणे

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा