Advertisement

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले

सकाळच्या सत्रात नफावसुलीचा दबाव आल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजीला ब्रेक लागला होता. मात्र त्यानंतर पुन्हा झालेल्या खरेदीने बाजारात तेजी आली.

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले
SHARES

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशातील शेअर बाजारात चांगली तेजी पहायला मिळाली. दिवसभरात सेन्सेक्सने ४५० अंकांची वाढ नोंदवत घेत  ५३ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीही १५९०० अंकापर्यंत वधारला होता. दिवसाअखेर सेन्सेक्स १३८ अंकांनी वधारून ५२९७५ वर बंद झाला. तर  निफ्टी ३२ अंकांनी वाढून  १५८५६ वर स्थिरावला.  

सकाळच्या सत्रात नफावसुलीचा दबाव आल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजीला ब्रेक लागला होता. मात्र त्यानंतर पुन्हा झालेल्या खरेदीने बाजारात तेजी आली. सेन्सेक्समधील ३० पैकी १६ शेअर तेजीसह बंद झाले. 

सेन्सेक्समधील आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एसबीआय, एचसीएल टेक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट आदी शेअर्स वधारले. तर इन्फोसिस, टीसीएस, टायटन, मारुती, बजाज ऑटो, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्सचे शेअर्स घसरले.

रियल्टी आणि टेलिकॉम इंडेक्सला आज विक्रीचा फटका बसला.तर आयटी क्षेत्रात खरेदी दिसून आली. निफ्टीतील आयडीएफसी बँक, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, आयडीबीआय बँक या शेअरमध्ये घसरण झाली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा