Advertisement

ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला भीषण आग

आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं.

ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला भीषण आग
SHARES

ठाण्यातील प्रभात टॉकीज गल्लीत इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दुकानांना मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राख झाल्या आहेत. आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं. 

ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन रोडवर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास या मार्केटमधील एका दुकानाला आग लागली. त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारणं केले. येथील दुकानांचे व्यापारी दुकान उघडण्यास आले असता त्यांना ही आग दिसली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसंच ठाणे अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ या ठिकाणी धाव घेतली.

आगीवर जवळपास एका तासाने नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीत गितेश इलेक्ट्रॉनिक्स, एफ एम सी मोबाईल्स ही दुकाने पुर्णपणे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 



हेही वाचा -

भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

  1. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर धावणार विशेष गाड्या
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा