Advertisement

तेलाच्या किंमतीमध्ये २० टक्क्यांची वाढ

आता सर्वसामान्यांचे कंबरडे खाद्य तेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या दरामुळे मोडले आहे.

तेलाच्या किंमतीमध्ये २० टक्क्यांची वाढ
SHARES

आता सर्वसामान्यांचे कंबरडे खाद्य तेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या दरामुळे मोडले आहे. खाद्य तेलाचे भाव गेल्या एका महिन्याच्या कालावधीत २० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. देशातील खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती या कारणीभूत असल्याचं भारतीय उद्योग मंडळानं सांगितलं आहे.

एकीकडे खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली. तर दुसरीकडे डाळीच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. दिल्लीच्या रिटेल बाजारपेठेत डाळीच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या सर्वात जास्त या किंमती असल्याचं सांगण्यात येतंय.

दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात ५ रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. आधीच लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी झालं होतं. त्याचबरोबर खाद्यतेलाची आयात कमी झाली होती. आता मागणी वाढली आहे.

आयातीवरील कर केंद्र सरकारनं कमी केले तरच तेल आणि डाळींचे भाव कमी होतील. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे वाहतूक खर्च पण वाढला हे ही त्यामागील एक कारण आहे.

'या' आहेत डाळिच्या आणि तेलाच्या किंमती

  • मोहरीचे तेल - 165 रुपये
  • रिफाईंड तेल - 155 रुपये
  • अरहर डाळ - 100 रु
  • मलका डाळ - 85 रुपये
  • चणा डाळ - 70 रुपये
  • उडदाची डाळ - 95 रुपये



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा