Advertisement

Coronavirus Updates: मुंबईतील रुग्णसंख्या २ हजार ७९८ वर पोहोचली

मुंबईमधील एकूण रुग्णांचा आकडा २ हजार ७९८ वर पोहोचला आहे.

Coronavirus Updates: मुंबईतील रुग्णसंख्या २ हजार ७९८ वर पोहोचली
SHARES

मुंबईत १३५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, मुंबईमधील एकूण रुग्णांचा आकडा २ हजार ७९८ वर पोहोचला आहे. यामध्ये  ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १३१ झाली आहे. रविवारी २९ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत ३१० जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर आणखी ३०३ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या प्रयोगशाळांव्यतिरिक्त अन्य खासगी प्रयोगशाळांमध्ये ज्या चाचण्या करण्यात येतात त्यापैकी १४ ते १६ एप्रिल दरम्यान केलेल्या चाचण्यांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यात १५४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यांच्यावर आधीच विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी २४ तासात ६ जणांचा बळी गेला. त्यात ५ महिला असून या सर्व महिलांना थायरॉइड, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होते. एक महिला केवळ २६ वर्षांची होती. ५० वर्षांच्या एका पुरुषाला कोणताही आजार नव्हता. माहीम पोलीस वासहतीतीतील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील आणखी चार पोलिसांनादेखील करोना झाल्याचे समजते. त्याच्या संपर्कातील १५ ते २० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा