कोरोनाचा कहर! राज्यात दिवसभरात 2940 नव्या रुग्णांची नोंद, दिवसभरात 63 रुग्णांचा मृत्यू


कोरोनाचा कहर!  राज्यात दिवसभरात 2940 नव्या रुग्णांची नोंद, दिवसभरात  63  रुग्णांचा मृत्यू
SHARES

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेॆदिवस वाढतच असून राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 582 पोहचली आहे. शुक्रवारी 2940 नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 857 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 12 हजार 583 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 30 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

राज्यात कोरोनाची लक्षण आढळलेल्या 3 लाख 32 हजार 777 नमुन्यांपैकी 2 लाख 88 हजार 195 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 44 हजार 582 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 69 हजार 275 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 28 हजार 430  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 63 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी झाली असून एकूण संख्या 1517 झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 27, जळगाव 8, पुण्यात 9, औरंगाबाद आणि वसई-विरार 3, सातारा 2, सोलापूरात 5, मालेगाव, ठाणे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली आहे. 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 37  पुरुष तर 26 महिला आहेत. आज झालेल्या 63 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 28 रुग्ण आहेत तर 31  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 63 रुग्णांपैकी 46 जणांमध्ये ( 73 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1517 झाली आहे. 

संबंधित विषय