Advertisement

मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन

धमकीच्या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन
SHARES

अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन (police helpline) नंबर 112 वर आला आहे. फोन कुठून आला याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पण धमकीच्या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हेल्पलाईनला फोन करणाऱ्याने असा दावा केला आहे की, अंधेरी येथील इनफिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जूहू येथील पीव्हीआर (PVR Mall) आणि सहारा हॉटेल (Sahara Hotel) एअरपोर्ट येथे बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Threat Call) होणार आहे.

धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सहारा एअरपोर्ट पोलीस, जूहू, अंबोली आणि बांगूर नगर पोलीस स्टेशन येथील पथक तसेच सीआयसीएफ आणि बीडीडीएस या पथकानं तपास कार्य सुरु केलं आहे. तिन्ही ठिकाणी पोलिसांनी तपास केला पण अद्याप त्या ठिकाणी कोणतीही स्फटोकं आणि संशयास्पद वस्तू मिळालेली नाही.

पोलीस अद्याप याचा तपास करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन 112 वर मंगळवारी रात्री साडेदहा वाजता फोन आला होता. मुंबई पोलीस फोन करणाऱ्यांचा शोध घेत आहे. फोन करणाऱ्याबाबात अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही.

अंधेरी येथील इनफिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जूहू येथील पीव्हीआर (PVR Mall) आणि सहारा हॉटेल (Sahara Hotel) एअरपोर्ट या तिन्ही ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात सणासुदीचे दिवस असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. अशातच धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तपास कार्य वेगानं करत आहेत.



हेही वाचा

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! रिक्षा-टॅक्सी चालक भाडे नाकारू शकणार नाहीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा