Advertisement

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! रिक्षा-टॅक्सी चालक भाडे नाकारू शकणार नाहीत

भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश शहरातील प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! रिक्षा-टॅक्सी चालक भाडे नाकारू शकणार नाहीत
(File Image)
SHARES

भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश शहरातील प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. याबाबतचे कार्यालयीन आदेश सोमवारी सहपोलीस आयुक्त (वाहतुक) राजवर्धन सिन्हा यांनी दिले आहेत.

रिक्षा व टॅक्सी चालक हे लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी अनेकदा नजिकचे भाडे नाकारत असल्याबाबत तक्रारी येतात. त्याबाबत मासिक आढावा बैठकीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक यांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

तसेच भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याबाबतचे फलक रेल्वे व बस स्थानकाबाहेर दर्शनी भागावर लावण्यात यावे, असे सांगण्यात आले आहेत.

भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर संबंधित रिक्षा, टॅक्सी चालकावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. तरी सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपल्या वाहतूक विभागातील रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या संघटनांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करावे.

तसेच रिक्षा व टॅक्सी चालक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागण्याबाबत आणि भाडे न नाकारण्याबाबत समज देवून त्यांचे प्रबोधन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षा व टॅक्सी चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी, असे आदेश वाहतुक पोलिसांना देण्यात आले आहेत.



हेही वाचा

मुंबई विमानतळावरील धावपट्ट्या मंगळवारी सहा तासांसाठी बंद

मुंबई-पुणे मार्गावर डिसेंबरपासून धावणार विजेवर चालणारी 'शिवाई' बस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा