Advertisement

नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात

वाचा विभागनिहाय वेळापत्रक

नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात
SHARES

नवी मुंबईतील नागरिकांना ऐन पावसाळ्यात आता पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. मोरबे धरणात केवळ 41 दिवस इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे. (Navi Mumbai Water Cut)

नवी मुंबईतील प्रत्येक विभागात आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. यासोबतच शहरातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या लोकसंख्यावाढीमुळे शहराला पाणी पुरवठा करणारे जलस्त्रोत कमी पडत आहेत. यंदाच्या वर्षी धरणांतील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. तसेच पावसाळा सुरू झाला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस पडत नाहीये. परिणामी नवी मुंबई मनपाने पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

धरणात असलेला हा पाणीसाठा 25 जुलैपर्यंतच पुरेल इतका आहे. जून महिन्याचे 15 दिवस उलटले तरी हवा तसा पाऊस धरण क्षेत्रात पडलेला नाहीये. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण नवी मुंबईत प्रभागनिहाय पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या विभागात कधी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

विभागाचे नाव
पाणी पुरवठा बंद कधी
ऐरोली
मंगळवार, शुक्रवार
घणसोली
बुधवार, शुक्रवार, रविवार
कोपरखैरणे
मंगळवार, गुरुवार, शनिवार
तुर्भे
मंगळवार, गुरुवार, रविवार
वाशी
सोमवार, बुधवार, शुक्रवार
बेलापूर
 सोमवार, बुधवार, शुक्रवार
नेरूळ
मंगळवार, गुरुवार, शनिवार
खारघर आणि कामोठे
सोमवार, गुरुवार, शनिवार


मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 190 एमसीएम इतकी आहे. सद्याच्या स्थितीत धरणात 50 एमसीएम पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 41 दिवस पुरेल इतकाच आहे.

धरणातील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद ठेणण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठी करुन ठेवावा. तसेच पाण्याची उधळपट्टी थांबवावी आणि पाण्याचा वापर जपून करावा.

यापूर्वी आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत होता. पण आता नव्या वेळपत्रकानुसार आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी शनिवार म्हणजेच 15 जून 2024 पासून करण्यात येणार आहे.



हेही वाचा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची POP गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी

ईदनिमित्त बेस्ट बसच्या मार्गात बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा