SHARE

डोंबिवली येथील खंबाळपाडा परिसरातील मॅनहोलमध्ये पडून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ३ कंत्राटी कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. मॅनहोल साफ करताना या तिन्ही कामगारांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला आहे.

या कामगारांचे मृतदेह मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशनम दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर या तिघांचे मृतदेह कल्याणच्या रुक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आल्याचंही गुंड यांनी सांगितलं आहे.


कशी घडली घटना?

खंबाळपाडा येथील एमआयडीसी परिसरात सकाळपासूनच मॅनहोल साफसफाईचं काम सुरू होतं. दुपारच्या वेळेस एका मॅनहोलमध्ये कंत्राटी कर्मचारी उतरले असता मॅनहोलमधील विषारी वायूने गुदमरून या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता आहे.


घटनास्थळी धाव

खंबाळपाडा इथं मॅनहोलमध्ये ३ कर्मचारी पडल्याची माहिती मिळाल्याबरोबर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. १५ ते २० मिनिटांत या तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आणि तिन्ही मृतदेह रुक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान मृत झालेल्या तिघांची नावंं अद्याप समजलेली नाहीत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या