Advertisement

विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३० कोटींचा दंड वसूल, मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबईत लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३० कोटींचा दंड वसूल, मुंबई महापालिकेची कारवाई
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन वारंवार मुंबई महापालिकेने केलं आहे. मात्र, अनेक नागरिक सोशल डिन्स्टसिंगच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. 

मुंबईत लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मार्च २०२० पासून मास्क न घालणाऱ्या १५ लाखाहून अधिक लोकांकडून पालिकेने तब्बल ३०.५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

पालिका आयुक्त आय.एस.चहल यांनी मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मास्क न घालणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या २५ हजार जणांना रोज पकडण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस मार्शलची संख्याही दुप्पट केली आहे. मुंबईत सध्या २४०० मार्शल्स असून ही संख्या दुपटीने वाढवून ४८०० करण्यात आली आहे.

मंगळवारी २२ हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. तर रेल्वेतही कारवाईने वेग घेतला आहे.  पोलीस, रेल्वे आणि मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईतून मंगळवारी ४५ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये क्लिन अप मार्शलने रस्त्यावरील कारवाईतून १४,६०६ नागरिकांकडून २९ लाख २१ हजार २०० रुपयां दंड वसूल केला आहे. तर पोलिसांनी ७९११ नागरिकांकडून १५ लाख ८२ हजार २०० रुपये आणि तीनही रेल्वेमार्गांवर ४५९ नागरिकांकडून ९१ हजार ८०० रुपये दंड़ वसूल करण्यात आली आहे.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा