Advertisement

मुंबईत ७ वर्षांत 'इतक्या' इमारती कोसळल्या

मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी या इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दरवर्षी अशा अनेक इमारती कोसळून अनेकांचे बळी जातात.

मुंबईत ७ वर्षांत 'इतक्या' इमारती कोसळल्या
SHARES
मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी या इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दरवर्षी अशा अनेक इमारती कोसळून अनेकांचे बळी जातात. मुंबईत २०१३ ते २०१९ या ७ वर्षांत ३९४५ घरांचे, इमारतींचे भाग कोसळून ३०० जणांचा मृत्यू झाला. तर ११४६ जण जखमी झाले आहेत. आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी ही माहिती दिली आहे.


शकील शेख यांनी मुंबईतील मागील काही वर्षांत इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांची माहिती महापालिकेकडून घेतली आहे. मुंबईत २०१३ ते २०१८ या सहा वर्षांत आग, इमारत कोसळणे किंवा इमारतीचा भाग पडणे, विजेचा धक्का, नाल्यात, समुद्रात वाहून जाणे, बुडणे अशा ४९ हजार १७९ दुर्घटना घडल्या आहेत. त्यात ९८७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन हजार ६६ जण जखमी झाले आहेत.  


२०१९ मध्ये पडझडीच्या ६२२ घटना घडून ५१ जणांचा बळी गेला. तर २२७  लोक जखमी झाले. त्याशिवाय २०१९ मध्येच घरं पडणं, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणं, शॉक लागणं, नाल्यात-समुद्रात वाहून जाणं, बुडणं अशा प्रकारच्या ९९४३ दुर्घटना घडल्या. यात १३७ जणांचा मृत्यू झाला, तर ५७९ जण जखमी झाले. त्यामध्ये ३७२ पुरुष, तर २०७ महिलांचा समावेश आहे.


वर्ष      दुर्घटना    मृत्यू      जखमी
२०१३     ५३१       १०१       १८३

२०१४      ३४३        २१       १००

२०१५      ४१७       १५        १२०

२०१६      ४८६        २४        १७२

२०१७       ५६८       ६६        १६५

२०१८       ६१९      १५          ७९

२०१९       ६२२       ५१         २२७



हेही वाचा -

फोर्ट इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अद्याप बचावकार्य सुरुच

कालच्या मुसळधार पावसात ‘इतक्या’ दुर्घटना मुंबईत घडल्या




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा